लाखनीच्या ‘निसर्गमहोत्सवा’ अंतर्गत ग्रीनफ्रेंड्स तर्फे “नेचर फिल्म शो” व सावरी तलाव व स्मशानभूमीत वृक्षारोपण कार्यक्रम….

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी:-

     ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे लाखनी शहरात श्रावण महिना ते दीपावली सुट्टीच्या कालावधीपर्यंत “निसर्गमहोत्सवा”चे आयोजन केले गेले असून त्याद्वारे विविध कार्यक्रम ,उपक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन केले गेलेले आहे.याच लाखनीच्या निसर्गमहोत्सवातंर्गत समर्थ विद्यालय लाखनी व गुरुकुल आयटीआय येथे “नेचर फिल्म शो” चे आयोजन केले गेले.

        “नेचर फिल्म शो” मध्ये जंगल जीवनावरील आधारित दोन लघुपट विद्यार्थ्यांना डब्ल्यूपीएसआय संस्थेतर्फे दाखवून त्यांच्यात निसर्ग- पर्यावरण विषयक जाणीव जागृती करण्यात आली.यावेळी समर्थ विद्यालय तसेच गुरुकुल आयटीआय येथे “नेचर फिल्म शो मध्ये प्रास्ताविक करताना लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर व नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब मागील 18 वर्षांपासून अखंडपणे ‘श्रावण महिना ते दीपावली सुट्टी’ पर्यंतच्या कालावधीत दरवर्षी आयोजित ‘निसर्गमहोत्सवा’ची कल्पना देऊन याद्वारे सर्वच सण कसे पर्यावरणपुरक प्रकारे साजरे केले जातात याची कल्पना दिली.

       तसेच त्यांनी या निसर्ग लघुपटाद्वारे निसर्ग पर्यावरणविषयक जाणीवजागृती विद्यार्थ्यांनी वाढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमाला नेफडो विभागीय वन्यजीव समिती जिल्हा भंडारा,अभा अंनिस तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा यांचे सहकार्य लाभले.यावेळी समर्थ विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अनिल बडवाईक व गुरुकुल आयटीआयचे प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम यांनी समयोचित मार्गदर्शन करून अनुक्रमे राष्ट्रीय हरित सेना समर्थ विद्यालय व गुरुकुल आयटीआयच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.डब्ल्यूपीएसआय या पर्यावरण संस्थाचे समन्वयक प्रफुल्ल वाघमारे तसेच बळीराम नेवारे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली व आपल्या परिसरात कुठेही गुप्तपणे जंगलात अवैध शिकार किंवा लाकुडतोड होत असल्यास दिलेल्या संपर्कनंबर वर कळवावे.त्याचे नाव गुप्त ठेवून योग्य खात्रीपूर्वक माहिती असल्यास त्यांना 15 हजार रुपये बक्षीस देण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.समर्थ विद्यालयाचे हरित सेना प्रभारी शिक्षक शुभम गद्रे ,गोवर्धन गिर्हेपुंजे, अनिल बावनकुळे यांनी तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तसेच मानव सेवा मंडळाचे अशोक वैद्य,ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे टोलीराम सार्वे, दिलीप निर्वाण,मंगल खांडेकर ,अशोक नंदेश्वर इत्यादींनी उपस्थिती दर्शविली.

   ” नेचर फिल्म शो” नंतर लगेच लाखनीच्या निसर्गमहोत्सवाअंतर्गत सावरी तलावावर व स्मशानभूमीमध्ये सौन्दर्यीकरण करण्याकरिता वृक्षारोपण कार्यक्रम सरपंच सचिन बागडे ,उपसरपंच मंगेश धांडे, पोलीस पाटील ऋषी दिघोरे,दुलेश धांडे, मोहन रेहपाडे, शशिकांत गायधनी, तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे पदाधिकारी प्रा.अशोक गायधने, अशोक वैद्य, अशोक नंदेश्वर, आराध्या आगलावे,ओंकार आगलावे इत्यादींच्या हस्ते घेण्यात आला.यावेळी तलावावर दोन्ही बाजूने सौन्दर्यीकरण व सावलीयुक्त असे अनेक झाडे व सावरी स्मशानभूमीत लावण्यात आली.ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी,नागठाण देवस्थान समिती,सावरी तसेच ग्रामपंचायत सावरी यांचे सहकार्याने लवकरच इथे सावरी तलावावर ‘ग्रीन पार्क ‘ तयार करण्याचे सहमतीने ठरले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

         वरील कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे,अशोका बिल्डकाँनचे पर्यवेक्षक अभियंता नितेश नागरीकर, गुरुकुल आयटीआय प्राचार्य खुशालचंद्र मेशराम,मुंबई इन्स्पेक्टर नेताराम मस्के,कार्यकारी बांधकाम अभियंता रजत अटकरे व ऋतुजा वंजारी,वनौषधी शेती पुरस्कर्ते इंजि. राजेश गायधनी ,ग्रीनफ्रेंड्सचे निसर्गमित्र पंकज भिवगडे, विवेक बावनकुळे, मयुर गायधने,सलाम बेग,धनंजय कापगते,खेमराज हुमे,नितीन निर्वाण इत्यादींनी सहकार्य केले.