अनं त्याला कर्जाने मारले…. — कर्ज देणेवाल्या सहकारी पतसंस्था व बॅंक कर्मचाऱ्यांचा तगादा भयंकर भितियुक्त व बदनामकारक..

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

       वृत्त संपादीका 

              गावोगावी फिरुन पुरुष व महिला गटांना कर्ज देणेवाल्या पतसंस्था व छोट्या बॅंक आता कर्ज धारकांसाठी कर्दनकाळ ठरु लागल्या असून कर्ज धारकांचे जिव घेऊ लागल्या असल्याचे विदारक वास्तव्य चिमूर तालुक्यातील मौजा भिसी येथील आत्महत्या प्रकरणानंतर समोर आले आहे.

          श्री.रामकृष्ण ईश्वर लांडे हे मजूर होते.मजूरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांची दिनचर्या होती,याचबरोबर ते निर्वेशनी होते व सभ्य होते.

        उमरेड येथील एस.के.एस.बँकची पंधरवाडी किस्त भरण्यासाठी त्यांच्याकडे रुपये जमा होवू न शकल्याने त्यांनी घरीच आत्महत्या केल्याचे दोन दिवसापूर्वीचे ताजे प्रकरण आहे.

      गटातील इतर पुरुषांना व महिलांना सोबत घेवून कर्ज पेड करण्यासाठी दबाव टाकण्याचा व बदनाम करण्याचा नवीन प्रकार सहकारी पतसंस्थेच्या व छोट्या बॅंकेच्या कर्मचाऱ्यांकडून आता सर्रास सुरु झाला आहे.असला प्रकार भयानक घातक व जिवघेणा ठरु लागल्याने सदर प्रकाराला वेळीच रोखणे गरजेचे आहे.

           हकीकत असी की, गावोगावी फिरुन कर्ज देणेवाल्या सहकारी पतसंस्थांचे व छोट्या बॅंकचे जाळे शहरी भागासह ग्रामीण भागात आता खूप पसरले आहे.

           सहकारी पतसंस्था व छोट्या बॅंकचे कर्मचारी गावोगावी फिरुन महिला गट व पुरुष गट तयार करतात आणि त्यांना महिणेवारी किंवा पंधरवाडी किस्त नुसार पेड करण्याच्या शर्ती प्रमाणे लघु कर्ज देतात.

         अल्पकालीन कर्ज देणे सहकारी पतसंस्था व छोट्या बॅंकेच्या दृष्टीने त्यांच्यासाठी फायद्याचे ठरु लागले आहे.तद्वतच मजूर व शेतकऱ्यांना कर्ज घेणे सोयीचे कसे आहे?हे पटवून कर्ज देतांना महिणेवारी किंवा पंधरवाडी कर्ज पेड किस्त हि सोयीची नाही हे मात्र कर्ज घेणाऱ्यांच्या लक्षात येत नाही.आणि इथेच आर्थिक व्यवहार अळचणीचे ठरतात.

              आता गावोगावी फिरुन कर्ज देणाऱ्या सहकरी पतसंस्थांचे व छोट्या बँक चे कर्मचारी कर्ज पेढसाठी तकादा करु लागले आहेत व कर्ज धारकास सार्वजनिक ठिकाणी बदनाम करु लागले आहेत.जोपर्यंत किस्तचे रुपये संबंधित कर्जदार देत नाही तोपर्यंत ते त्याच्या घरुन हटत नाही.एकट्याने भागले नाहीतर त्या बँकचे किंवा त्या सहकारी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी येतात व संबंधित व्यक्तीवर मरनासंन्न दबाव टाकतात.  

        असला दबाव प्रकार एकूणच गंभीर असल्याने कर्ज धारकांसाठी डोयीजड ठरु लागला आहे व जिव गमवणारा सुध्दा ठरु लागला आहे.

         कर्जफेड करण्यासाठी तकादा लावणे ही कायदेशीर प्रक्रिया असली तरी बदनाम करणारी व जिव घेणारी नसावी.

        जे सहकारी पतसंस्थेचे किंवा छोट्या बॅंकचे कर्मचारी कर्ज पेड करण्यासाठी तगादा लावतात व बदनाम करतात त्यांचेवर फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे.

          किंवा त्यांच्या तकाद्याने व बदनामीने एखादा कर्ज धारक पुरुष किंवा महिला आत्महत्या करीत असेल तर त्या संबंधित सहकारी पतसंस्थेच्या व छोट्या बॅंकच्या सर्व कर्मचारी व्यक्तींवर भांदवी ३०२,३०४ (३४) व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल होणे बंधनकारक असायला पाहिजे.

        तद्वतच सदर सहकारी पतसंस्थेकडून व बॅंक कडून कर्जदार आत्महत्या प्रकरणाला अनुसरून २० लाख रुपयांची मदत आत्महत्याग्रस्त कुटुबियांना मिळालीच पाहिजे,अशी व्यवस्था महाराष्ट्र शासनाचे संबंधित विभाग करेल काय?हा प्रश्न पोटतिडकीचा…