वाघोडा येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न…

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी : – ग्राम पंचायत वाघोडा येथे आयोजित आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्षा व्दारे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदु तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिरात १७३ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.  

             शनिवार (दि.२०) मे २०२३ ला ग्राम पंचायत वाघोडा येथे आपला आमदार आपल्या सेवी अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्षा व्दारे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदु तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिबिरात मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थी- २३ , औषधी द्वारे उपचार होणारे लाभार्थी – ४७, तिरळे पणा आजार – १ व चष्मे करिता १०२ लाभार्थीं असे एकुण १७३ लाभार्थ्यानी शिबीरात लाभ घेतला. येत्या (दि.९) जुन २०२३ ला मोफ़त १०२ लाभार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ग्रा प वाघोडा सरपंचा सौ. शुभांगी बावने, उपसरपंच मा. विलासजी गि-हे, प्रतिक गेडाम, सूरज चौधरी, गौरव पनवेलकर, सुमित कांबळे आदी प्रामुख्याने उपस्तिथ होते.