अंगाला हळद लागण्यापूर्वीच तरुणीचा मृत्यू, चंद्रपूर येथील घटना..

 

युवराज डोंगरे

उपसंपादक

अंगाला हळद लागण्यापूर्वीच हळदीच्या दिवशीच तरुणी दुःखद मृत्यू झाल्याची घटना खल्लार नजिकच्या चंद्रपूर येथे घडली.

चंद्रपूर येथील प्रल्हाद पगारे यांची द्वितीय कन्या पूजा उर्फ छकुली हिचा विवाह लोणी अरब येथील पद्माकर वाघमारे यांचा मुलगा प्रणय याच्याशी दि 21 मे रोजी चंद्रपूर येथे पार पडणार होता. लग्नाची सर्व तयारी झाली होती. सर्वांना लग्नाचे निमंत्रणही पाठविण्यात आले होते. मात्र नियतीला ते मान्य नव्हते की काय दि 19 मे ला पुजाची तब्बेत अचानक खालावली तिला उपराचार्थ खाजगी दवाखान्यात नेले तिथे प्रथमोचार केल्यानंतर खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांनी तिला अमरावती येथे हलविण्याचा सल्ला दिला लगेच तिला अमरावती येथील डॉ पंजाबराव देशमुख दवाखान्यात हलविण्यात आले तिथे तिच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच आज 20 मेला दुपारच्या सुमारास दुःखद निधन झाले अंगाला हळद लागण्याआधीच तरुणीचा दुःखद मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आनंदाचा हिरमोड झाला

गावात 21 मे रोजी लग्न होत असल्याने पूजाच्या घरच्या लोकांनी,नातेवाईकांनी व गावातील नागरिकांनी पूजाच्या लग्नासाठी मोठ्या आनंदाने आंदण घेतले होते. मात्र लग्नाच्या एक दिवस आधीच पूजाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आनंदाचे रूपांतर दुःखात झाले या घटनेमुळे सर्वत्र दुःख व हळहळ व्यक्त केली जात आहे