Home Political भाजपा धानोरा तालुकाध्यक्षपदी साजन गुंडावार यांची नियुक्ती…

भाजपा धानोरा तालुकाध्यक्षपदी साजन गुंडावार यांची नियुक्ती…

भाविकदास करमनकर

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

धानोरा (गडचिरोली): भारतीय जनता पार्टीच्या धानोरा तालुकाध्यक्षपदी साजन गुंडावार यांची अधिकृत नियुक्ती आज जाहीर करण्यात आली.

         याप्रसंगी आ.मिलिंद नरोटे,प्रकाश गेडाम,ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिलजी तिडके, अनंत साळवे यांच्यासह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         नवनियुक्त तालुकाध्यक्षांचे अभिनंदन करताना, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी त्यांच्या योगदानाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पक्षाच्या पुढील कार्यवाहीसाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.