ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- भारतीय जनता पार्टी साकोली शहर मंडळाच्या अध्यक्षपदी व्यंकटेश येवले यांची निवड करण्यात आली.
व्यंकटेश येवले यांनी भारतीय जनता पक्षाच्या विविध पदांवर कामे केलेली आहेत.यामध्ये साकोली शहर महामंत्री,साकोली शहर सोशल मीडिया प्रमुख,तालुका सोशल मीडिया प्रमुख, सध्या साकोली विधानसभा सोशल मीडिया प्रमुख व भंडारा जिल्हा सहसंयोजक सोशल मीडिया व शक्ति केंद्र प्रमुख साकोली या पदावर कार्यरत असुन ते सोनार समाजाचे मागील पाच वर्षांपासून अध्यक्ष म्हणुन काम सांभाळत आहेत.
त्यांनी ह्या नियुक्तीचे श्रेय प्रदेश कार्यकारिणी भाजपा,माजी राज्यमंत्री व विधानपरिषद आमदार परिणयजी फुके,जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, माजी तालुकाध्यक्ष भोजराम कापगते व अमोल हलमारे, माजी शहराध्यक्ष नितीन खेडीकर, भाजपा जिल्हा सचिव किशोर पोगडे तसेच भारतीय जनता पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिले आहे.
या निवडीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.



