कांग्रेस व भाजपाला सत्तेपासून दूर करा,दोन्ही पक्ष बहुजनांना हक्कांपासून वंचित ठेवणारे व बहुजनांवर अन्याय करणारे असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.:- बसपा सुप्रिमो बहन मायावती.. — सत्तेवर आल्यानंतर दोन्ही पक्ष रंग बदलणारे..

   प्रदीप रामटेके

     मुख्य संपादक 

            राजस्थान व तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा व काँग्रेस पक्षावर चौफेर हल्ला करतांना बसपा सुप्रिमो बहन मायावती उपस्थित लाखो जनसमुदायाला संबोधतांना म्हणाल्यात कांग्रेस व भाजपा पक्षाचे प्रमुख नेते प्रचारादरम्यान राज्यातील जनतेला भरभरून आश्वासने देतात आणि सत्तेवर येतात.मात्र सत्तेवर आल्यानंतर बोलल्याप्रमाणे कार्ये करीत नाहीत व कर्तव्य पार पाडीत नाहीत.

         भाजपा व काँग्रेस आलटून पालटून केंद्रीय आणि राज्य सत्तेवर आल्यानंतर सुध्दा आतापर्यंत त्यांनी जातिनिहाय जनगणना केली नाही व सत्तेत आणि शासकीय कार्यालयात समान प्रमाणात बहुजन समाजातील नागरिकांना प्रतिनिधीत्व दिले नाही.

        यामुळे मनुवादी विचारसरणीचे भाजपा व काँग्रेस पक्ष जातिनिहाय जनगणना करून,”तुम्हाला तुमच्या लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधीत्व देणार यावर विश्वास ठेवू नका आणि भाजपा-कांग्रेस पक्षाला सत्तेवर आणू नका असा शब्द प्रहार करीत,प्रचार सभेला उपस्थित असलेल्या लाखो जनसमुदायाला सतर्क केले.

           परत बसपा सुप्रिमो बहन मायावती संबोधित करताना म्हणाल्यात,”बसपाने इतर सर्व समाज घटकांच्या नागरिकांसह ओबीसी,विशेष मागासवर्गीय,आदिवासी,एससी, अल्पसंख्याक,विमुक्त भटक्या जमाती-जाती समाज घटकातील नागरिकांच्या उन्नतीसाठी व त्यांना सत्तेत आणि शासकीय कार्यालयात समप्रमानात प्रतिनिधीत्व देण्यासाठी सातत्याने देशभरात जन आंदोलने केलीत.प्रत्येक समाज घटकातील नागरिकांना त्यांच्या हक्कांसंबंधाने जागरूक करण्यासाठी देशभरात नेहमी कार्यक्रमे केलीत,आताही बसपाद्वारे जनजागृतीचे कार्ये सुरु आहेत.यामुळे देशभरातील बहुजन समाज जागरूक व सतर्क होवू लागला आहे.

           मात्र,भाजपा व काँग्रेस पक्षाच्या भावनात्मक आणि बनवाबनवीच्या जुमलेबाज घोषणांना देशातील बहुसंख्य समाज घटकातील नागरिक अजूनही बळी पडतो आहे आणि त्यांनाच आलटून पालटून सत्तेवर आणतो आहे.आता वंचित,शोषीत,अत्याचारग्रस्त, पिडीत,अन्यायग्रस्त सर्व समाज घटकातील नागरिकांनी, जुमलेबाज दोन्ही पक्षांना सत्तेत येण्यापासून रोखणे आवश्यक असून त्यांना सत्तेपासून दूर केले पाहिजे तरच देशातील सर्व नागरिकांचे कल्याण होवू शकते.

          त्या पुढे म्हणाल्या की माझा पक्ष,कार्यकर्त्यांच्या आर्थिक सहकार्यातून लोकसभा व विधानसभा निवडणूक लढतो आहे तर भाजप व काँग्रेस पक्ष भांडवलदारांच्या रुपयांवर निवडणूक लढवतात‌.म्हणूनच भाजपा व काँग्रेस पक्ष हे सत्तेवर आल्यानंतर भांडवलदारांच्या हितासाठी कामे करतात,या देशातील नागरिकांच्या सर्वांगिण हिताकडे व विकासाकडे ते दुर्लक्ष करतात.

           बसपा हा पक्ष कार्यकर्त्यांच्या आर्थिक सहकार्यातून लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवत असल्याने,देशातील लोक कल्याणाला आणि लोक सुरक्षेला बसपा प्राधान्य देऊन कार्ये करतो व अनेक धोरणात्मक कर्तव्य पार पाडतो आहे.

           या देशातील नागरिकांचा सर्वांगिण विकास करणारा व त्यांची सर्वोतोपरी सुरक्षा करणारा एकमेव पक्ष बसपा आहे,यामुळे राजस्थान व तेलंगणा राज्यातील मतदारांनी बसपाला सत्तेवर आणले पाहिजे असे आवाहन दोन्ही राज्यातंर्गत मतदारांना बसपा सुप्रिमो बहन मायावती यांनी प्रचारसभा अंतर्गत संबोधनातून केले आहे.

           काका कालेलकर व मंडल आयोग कमिशन लागू करण्याचा मुद्दा जेव्हा लोकसभेत चर्चेला येतो तेव्हा भाजपा व काँग्रेस पक्षाचे खासदार चूपी साधतात,”दोन्ही आयोच्या शिफारशींना लागू करण्यासाठी व या शिफारशींचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी कायदा करीत नाही.यावरुन हे लक्षात येते की भाजपा व काँग्रेस पक्ष,”बहुजन समाज विरोधी आहेत,असेही त्या म्हणाल्यात.

          उलट बहुजन समाजातील नागरिकांवर अन्याय व अत्याचार करणाऱ्या घटना राज्यात घडत असताना या दोन्ही पक्षाचे सत्ताधारी वेळकाढू भुमिका घेतात.राज्यातील जनतेला भयमुक्त ठेवण्यास कठोरपणे लायन आर्डरची अंमलबजावणी करीत नाही.असे पक्ष तुमचे होवू शकत नाही याकडे उपस्थित लाखो नागरिकांचे लक्ष वेधले.

         परत त्या म्हणाल्या,माझ्या बाबतीत डमी व्हिडिओ तयार करून माझ्या संबंधाने अपप्रचार करीत आहेत,यामुळे कांग्रेस व भाजपाच्या अपप्रचाराला बळी पडू नका व बसपाला भरघोस मतदान करुन सत्तेवर आणा,असे सरतेशेवटी आवाहन केले.