वारकरी संगीत परंपरा पं.कल्याणजी गायकवाड परीवाराने आदर्शवत जोपासली आहे : युवराज छत्रपती संभाजीराजे… — पं.कल्याणजी गायकवाड लिखित “वारकरी संगीत परंपरा” या ग्रंथाचे प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्राला वारकरी संप्रदायची परंपरा लाभली आहे, या परंपरेत समृद्ध संगीत परंपरा पंडित कल्याणजी गायकवाड यांच्या बरोबर कार्तिकी गायकवाड -पिसे, कौस्तुभ गायकवाड यांनी आदर्शवत वारकरी संगीताची परंपरा जोपासली आहे असे युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले.

         गुरुवर्य पंडित कल्याणजी गायकवाड गुरुजी यांचा गुरु अभिवादन सोहळा तसेच कृष्णाई संगीत महोत्सवाचे आयोजन आळंदी येथील रसिकलाल धारीवाल सभागृहात उत्साहात संपन्न झाला. यावेळी “वारकरी संगीत परंपरा” या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभहस्ते व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सोहळ्यात पंडित अजयजी पोहनकर यांना गुरु महाराव पुरस्कार, उद्योजक पुनीत बालन यांना सामाजिक कार्यगौरव पुरस्कार व उद्योजक बाळासाहेब पाटील यांना उद्योगरत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

          यावेळी पंडित कल्याणजी गायकवाड, आरएमडी फाऊंडेशनच्या शोभाताई धारीवाल, महागायिका कार्तिकी गायकवाड -पिसे, कौस्तुभ गायकवाड, उद्योजक रोनीत पिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, रामदास ठाकूर, भानुदास खोतकर, बबनराव कुऱ्हाडे, डि.डि.भोसले, अजित वडगावकर, संजय घुंडरे, श्रीधर कुऱ्हाडे, राहुल चव्हाण, डॉ.धनंजय जाधव, अक्षय महाराज भोसले, अशोक उमरगेकर, आदिनाथ महाराज सटले तसेच पंडित कल्याणजी गायकवाड यांचा शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.