स्विफ्ट डिझायर कारने दूचाकी गाडीला दिली धडक… — दोन जखमी..

रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर: –

       चिमूर–वरोरा राष्ट्रीय महामार्गातंर्गत बोथली–खानगाव गावाजवळ स्विफ्ट डिझायर क्रमांक एम.एच.-३९,ए.एस.-२२१७ या गाडीने दुचाकीस धडक दिल्यामुळे अपघातात दोन व्यक्ती जखमी झाल्याची घटना आज साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली.

         जखमीचे नाव एकनाथ वामन गजभिये वय ४० वर्षे व सौ.बेबीनंदा एकनाथ गजभिये वय ३७ वर्षे असे आहे.ते राहणार बाम्हणी येथील रहीवासी आहेत.

             जखमी बाईक स्वार हे एम.एच-३४,बि.यू.९२४७ या दुचाकी वाहनाने चिमूर वरून वरोरा येथे जात असता.मागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीने त्यांच्या बाईकला धडक दिली.धडकेत बाईक स्वार दोघेही पतीपत्नी जखमी झालेत.

           स्विप्ट डिझायर चा गाडी चालक धडक देऊन फरार झाला आहे.या अपघाताची माहिती नागरिकांना होताच ताबडतोब जखमींना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले. 

              चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमीवर प्राथमिक उपचार सुरू आहे.‌