सखाराम भानारकर यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद…

उमेश कांबळे

ता प्र भद्रावती 

        आयुध निर्माणी चांदा येथील सेवानिवृत्त अधिकारी व अंबरनाथ मुंबई येथे स्थायी झालेले सखाराम भानारकर यांचे नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. त्यांना नुकत्याच पार पडलेल्या एका समारोहात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा किताब व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

         केंद्र सरकारच्या आयुध निर्माणीत विविध पदावर कार्य करीत त्यांनी आयुध निर्माणी चांदा येथे ३४ वर्षे नोकरी करून आयुध निर्माणी अंबरनाथ येथून सन २००३ ला निवृत्त झाले. विविध प्रकारचे सामाजिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी रेल्वे, राज्य सरकार,केंद्र सरकार, यांच्याशी सतत पत्रव्यवहार केला.

           त्यांच्या या पत्रव्यवहारामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले.नवीन रेल्वे मार्ग,रेल्वेचे थांबे, औद्यगिक प्रशिक्षण केंद्र आदी मिळण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्त्रवव्याहर केला. गेल्या ४० वर्षांपासून त्यांचा पत्रव्यवहार सतत सुरू आहे. चंद्रपूर,ब्रम्हपुरी,भद्रावती या भगातील विविध प्रश्ननासाठी त्यांनी हा पत्रव्यवहार केला.त्यांच्या या कामाची दखल घेऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने त्यांची नोंद घेतली. त्यामुळेच त्यांना हा सन्मान मिळाला.त्यांची अनेक विषयांवर बरेचशा कादंबऱ्या व पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. 

   त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने पुरस्कृत केले. त्यांचेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.