पिंपरी बुद्रुक गावचे आराधी मंडळ व मळवली येथील लक्ष्मण तात्या वाघमारे आराधी मंडळ यामध्ये रंगला गाण्याचा जंगी सामना.

  बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

      पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील आई तुळजा भवानी मातेच्या मंदिरा मध्ये रंगला आराधी गाण्याचा जंगी सामना .सालाबाद प्रमाणे होणारा नवरात्र उत्सव सन हा शिवशक्ती तरुण मंडळ नवरात्र उत्सव पिंपरी बुद्रुक यांच्या सहकार्याने,, पिंपरी बुद्रुक ते तुळजापूर भवानी मातेच्या मंदिरातून पायी चालत ज्योत घेऊन आल्यानंतरच भवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली.

        यानंतरच नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आसतो.  चौथ्या दिवशी गाण्याची सेवा मळवली येथील लक्ष्मण तात्या वाघमारे आराधी मंडळ व पिंपरी पंचक्रोशीतील सर्व आराधी मंडळ यांच्यात जुगलबंदी सामना झाला. देवीच्या गाण्यातून ऐकणारे भाविक भक्त आणि आराधी मंडळाची मने जिंकली.

        या कार्यक्रमासाठी पिंपरी बुद्रुक येथील आजी माजी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य समस्त ग्रामस्थ आणि महिला भगिनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

         तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याच्या माजी संचालीका सुभद्राताई महादेवराव बोडके यांनी पण देवीच्या गाण्याचा आनंद घेत आपली उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमासाठी मळवली तालुका माळशिरस येथील आराधी मंडळ व पिंपरी बुद्रुक मधील आराधी मंडळ यांच्यात गाण्याचा जंगी सामना झाला व आनेक भाविक भक्त,व महीला भगिनी या ठिकाणी उपस्थितीत होते.

         शिवशक्ती तरुण मंडळ नवरात्र उत्सवाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात कार्यक्रम पाहण्यासाठी दररोज भवानी मातेच्या मंदिरात आपली हाजेरी लावतात.