शीतला माता मंदिर रामसरोवर टेकाडी येथे नवरात्रोत्सव.. — घटस्थापना व नव दिवस ज्योत आणि धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल. 

 

कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान : – टेकाडीच्या राम सरोवर येथील शीतला माता मंदीरात घटस्थापनातंर्गत नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल भाविकांसाठी असणार आहे. 

           प्रभु श्री.राम,सीता व लक्ष्मण हे वनवासात असताना टेकाडी गावा बाहेरील सरोवर जवळ थांबले असल्याने या पावन भुमीला राम सरोवर नाव तेव्हा पासुन पडले आहे. 

          येथे राम सरोवराच्या काठावरील शीतला माता मंदीरास विशेष महत्व प्राप्त असल्याने दरवर्षी नवरात्र मध्ये शीतला मातेच्या दर्शनार्थ भावि कांची गर्दी होत असते.शीतला माता मंदिरात रविवारला घटस्थापना करून नऊ दिवसाकरिता अखंड ज्योत प्रज्वलित करून नवरात्रोत्सवाची सुरूवात होणार आहे.

         दररोज धार्मिक कार्यक्रमाची रेलचेलसह अनेक भजन मंडळे वेगवेगळ्या दिवशी भजन गायन व जागरण कार्यक्रमातंर्गत मातेचे जागरण करणार आहेत. 

          अनेक भक्त रात्री निवासी असुन नवरात्राच्या औचित्य साधुन मंदिराला विशेष रोषणाई करण्यात आल्याने परिसर सुशोभित व मनमोहक झाला आहे. 

         येथे दर्शनाकरिता येणा-या भाविक भक्ता करिता या वेळी गुरुकृपा आखाडा टेकाडी तर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली.तसेच नवमी ला महाप्रसादाची व्यवस्था सुध्दा करण्यात आलेली आहे.

         मंदिरात अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होऊन दर्शनाचा लाभ घेत आहे.श्री. हनुमान मंदिर पंच कमेटी टेकाडीचे अध्यक्ष पंढरीजी बाळबुधे,सुखदेव सातपैसे,मनोज लेकुरवाडे,देवेंद्र शेंगर,मनोहर सातपैसे,अमित वासाडे,रामु सातपैसे,गुरूकृपा आखाडा प्रमुख निलेश गाढवे आदीसह ग्रामस्थ व भाविक भक्त विशेष सहकार्य करित परिश्रम घेत आहे.