सुपर टाऊन येथे घरफोडी… — अज्ञात चोरट्यांनी १ लाख ९० हजार रुपयांचे दागीने व रोख केली लंपास.  — परिसरात भीतीचे वातावरण… — पोलीस गुन्हेगाराच्या शोधात…

 

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 

पारशिवनी: – पोलीस स्टेशन अंतर्गत सुपर टाऊन पारशिवनी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली व एक लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरुन पसार झाले.

              फिर्यादी मनोज मदनराव लुथडे वय ४२ राहणार प्लाट न.६ सुपर टाऊन पारशिवनी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन पारशिवनी येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

            प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१८) सेप्टेबरला सकाळी ९ वाजता मनोज लुथडे व पत्नी सरोज मनोज लुथडे हे दोघेही सरकारी नोकरी असल्याने कर्तव्यावर गेले होते.ते स्वत: नागपुर जिल्हा सत्र न्यायालय नौकरीवर आहेत तर त्यांची पत्नी सावनेर येथे नौकरी आहे. 

       . घटनेच्या दिवसी पत्नी सरोज यांनी घराचे मुख्य दारास व वाल कंपाऊडचे लोखंडी गेटला ताला लावला व यानंतर दोघेही आप आपल्या कामावर निघुन गेले होते.

       तक्रारदार मनोज लुथडे हे आपल्या जिल्हा सत्र न्यायालय येथे ड्युटीवर असताना घराचे मागे राहणार शेजारी पाडुरग ढगे यांनी दुपारी १.१५ वाजता फोन वरुन सागितले की कंपाऊड गेटला टाला लावून आहे परन्तु घराच्या मुख्य दरवाजाचा ताला तुटलेला दिसत आहे.तुम्ही लवकर या व घरची वास्तविक स्थिती बघून घ्या.

           माहिती मिळताच मनोज लुथडे हे पारशिवनी करिता निघाले व घरी आल्यावर पाहिले कि लोखडी गेटचा ताला लागला होता व घराच्या मुख्य दरवाजाच्या ताला तुटलेला होता व उत्तर कडील भागाचे खिडकी वर ठेवलेला ताला व आकोडाचा खालचा भाग किचित दबलेला दिसला.

          त्यामुळे अल्ड्राप उघडून मुख्य दारातुन हाल मध्ये पाहिले तर बेडवरील गादी अस्ताव्यस्त दिसली.त्यानंतर बेडरूम मधील अलमारी पाहिले तर किसन व बेडरूमचे उतर दक्षिणच्या भिंतीला लागुन असलेल्या अलमारीतील प्लास्टिक डबी मध्ये ठेवलेले सोन्याचे पदक मंगलसुत्र किमत ९० हजार रुपये,दुसर्‍या डबी मध्ये १५ ग्राम सोन्याची चैन ( गोप) किंमत ४५ हजार रुपये,१० ग्रामची दोन सोन्याची अंगठी किमत ३० हजार रुपये,पर्स मध्ये ठेवले पत्नीचे नावाचे व तक्रारदार यांचे दो एटीम कार्ड व रोख २५ हजार रुपये रोख असे एकुण १ लाख ९० हजार रुपये सोन्याचे दागीने व रोख रक्कम अज्ञात चोराने चोरून नेल्याने दिसून आले.

          तक्रारदार मनोज मदनराव लुथडे राहणार प्लॉट नंबर ६ सुपर टाऊन पारशिवनी यानी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्याने पोलिसानी गुन्हा नोंद केला व घटनेचा तपास पो.नि.राहुल सोनवने यांचे मार्गदर्शनात पो.उप नि.आकरे करीत आहेत.

         मात्र अज्ञात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकेल की नाही हे सांगणे आज तरी उचित नाही .