उद्योजक बाळासाहेब देशमुख यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘ यशस्वी मराठा उद्योजक ‘ पुरस्काराने सन्मानित… — मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात उद्योजक बाळासाहेब देशमुख (काका) टेंभुर्णीकर यांना पुरस्कार मिळाला….

निरा नरसिंहपुर दिनांक :19

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार, 

      टेंभुर्णी तालुका माढा येथील सुपुत्र व उद्योजक बाळासाहेब देशमुख यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

       गेट वे ऑफ इंडिया , मुंबई येथे झालेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या दिमाखदार सोहळ्यात माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील उद्योजक बाळासाहेब लक्ष्मणराव देशमख यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते “ग्रामीण भागातील सामाजिक भान ठेवणारे यशस्वी मराठा उद्योजक” म्हणून गौरविण्यात आले.

       रविवारी 14 मे रोजी सायंकाळी पाच वाजता गेटवे ऑफ इंडिया , मुंबई येथे जाहीर कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेब देशमुख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

       या पुरस्कार सोहळ्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत , महिला व बाल कल्याण मंत्री

मंगलप्रभात लोढा, मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील , आमदार प्रकाश सुर्वे,आमदार यामिनी जाधव आदी उपस्थित होते . 

        टेंभुर्णी तालुका माढा येथील बाळासाहेब देशमुख हे “देशमुख & कंपनी” या उद्योग समूहाचे प्रमुख आहेत . देशमुख यांना या अगोदर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते ही गौरविण्यात आले आहे .

            मुंबईतील या पुरस्कार सोहळ्यात उद्योजक सुरज देशमुख ,हर्षवर्धन देशमुख , लता देशमुख , प्रियंका देशमुख , रावसाहेब नाना देशमुख यांचेसह देशमुख कुटुंब सर्व सदस्य व सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.