Home Maharashtra ग्रामपंचायत सावरी बीड येथे महाराष्ट्र दिन संपन्न!…

ग्रामपंचायत सावरी बीड येथे महाराष्ट्र दिन संपन्न!…

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी…

    सावरी (बिड) येथील ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी साडेआठ वाजता सरपंच लोकनाथ रामटेके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

       त्यानंतर रोजगार हमी योजनेच्या कामगारांना प्रमाणपत्र व पुष्पगुच देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी निखिल सहारे यांनी केले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच लोकनाथ रामटेके यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथी म्हणून किरण मेश्राम,नलू शेंबडे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरेश मेश्राम संगणक परिचालक,दिलीप डांगे शिपाई,विलास चौखे यांनी सहकार्य केले.

      कार्यक्रमात लोकेश खामनकार,अनिल रामटेके,बबिता रामटेके,पुंडलिक करकाळे,लता मेश्राम विविध गावकरी उपस्थित होते.

     सरपंच लोकनाथ रामटेके मार्गदर्शन करताना म्हणाले महाराष्ट्र ही केवळ एक भौगोलिक सीमा नाही तर तो एक विचार आहे,एक संस्कृती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेला एक महान वारसा आहे.

      संयुक्त महाराष्ट्रच्या लढात ज्या हुतात्म्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून ही मंगल धरा आपल्याला मिळवून दिली,त्या सर्व ज्ञात- अज्ञात क्रांतीकारकांच्या चरणी सरपंच लोकनाथ रामटेके हे नतमस्तक झाले…