सुहानी श्रीमंत पडळकर ही बारावी सी.बी.एस.इ.बोर्ड परीक्षेमध्ये 96% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.

नीरा नरसिंहपुर दिनांक :19

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

          पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पडळकर कुटुंबातील श्रीमंत आंकुश पडळकर सर यांची कन्या सुहानी पडळकर या विद्यार्थिनीने सी.बी.एस इ.बोर्ड बारावी परीक्षेमध्ये 96% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवीला. त्याबद्दल सर्वच,थरातून व तालुक्यातून या विद्यार्थ्यांचे कौतुक होऊ लागले.

         तसेच या विद्यालयाचे श्री. डॉक्टर कदम व सौ.कदम मॅडम, प्रिन्सिपल व सर्व शिक्षक यांनी याबद्दल कौतुक करून आशीर्वाद दिले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या, पडळकर कुटुंबात 96% टक्के गुण मिळवणारी पहिलीच विद्यार्थीनी आसल्यामुळे सर्व स्तरातून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने इंदापूर तालुक्यात कौतुक करून शाब्बासकी मिळवली.

           पिंपरी बुद्रुक येथील श्रीमंत आंकुश पडळकर हे चैतन्य विद्यालय नीरा नरसिंहपूर या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यांच्या कन्येने बारावीत उत्कृष्ट रित्या चांगले गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला म्हणून इंदापूर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये डॉक्टर कदम गुरुकुल इंदापूर या विद्यालयाच्या नावाची ओळख झाली. श्रीमंत पडळकर सर ,यांचे डॉक्टर कदम गुरुकुल इंदापूर,व चैतन्य विद्यालय नीरा नरसिंहपूर यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.