राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
मालेवाडा येथील ॲड.विठ्ठलराव बनपुरकर कला व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनी स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शनचे आयोजन प्राचार्य डॉ. एच एम कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय विभागाद्वारे करण्यात आले.
प्रमुख पाहुणे प्रा.डॉ वर्षा ठाकरे, ,प्रमुख अतिथि प्रा. डॉ.वैद्य हे होते. प्रा.डॉ. ठाकरे मॅडम यांनी फीत कापून स्पर्धा परीक्षाच्या पुस्तकाच्या प्रदर्शनीचे उद्घाटन केले अनेक विद्यार्थीनीनी या प्रदर्शनाला भेट दिली. एक उत्कृष्ट असा कार्यक्रम ग्रंथालय विभागाद्वारे महाविद्यालयात आयोजित केला.
या प्रसंगी मोठ्या संख्येने महाविद्यालयिन विद्यार्थी तसेच प्राध्यापक डॉ.पल्लवी काळे , प्रा.डॉ.राऊत, प्रा. डॉ.वैद्य , प्रा. नंदेश्वर, प्रा.अष्टेकर , प्रा.शहारे, प्रा.कराडे प्रा.सहारे, प्रा.रामटेके, प्रा.कुमंरे , प्रा. ठाकूर,प्रा.अष्टेकर,श्री.बनपुरकर,श्री.उईके,श्री.सेलोकर,श्री.समर्थ,श्री.वालदे,श्री.जाभुळे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



