गंगाई बहुद्देशीय संस्था हिंगणघाट तर्फे बालविवाह मुक्त अभियान संपन्न….

प्रितम जनबंधु

   संपादक 

          हिंगणघाट (वर्धा) :- गंगाई बहुद्देशीय संस्थेतर्फे उपाध्यक्ष मंगला लोखंडे, सचीव डाॅ प्रफुल मुरार याचे मार्गदर्शनात चिकमोह गावात रॅली काढुन बालविवाह मुक्त भारत अभियान विषयावर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सदर रॅलीमधे बहुसंख्य शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

                  त्यानंतर प्राध्यापक मेघा हिंगमिरे, खैरकर सर, तडस सर, यानी बालविवाह मुक्त अभियान विषयावर सखोल मार्गदर्शन करुन जनजागृतीपर व्याख्यान दीलं.

 

                   जिल्ह्य़ात कुठेही बालविवाह होऊ नये याकरिता बालविवाहाला आळा घालण्यासाठी प्रतिबंध म्हणून बालविवाह मुक्त भारत अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत चिकमोह ता. हिंगणघाट, जि. वर्धा येथे कार्यक्रम घेण्यात आले.

        त्या अनुषंगाने गंगाई बहुद्देशीय संस्था हिंगणघाट, जि. वर्धा यांच्या वतीने बालविवाह मुक्त भारत अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम पटवुन देण्यात आले.     

                 यावेळी सरपंच अनिल वागदे, भारत उबाढ ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील साहेब, आशा स्वयंसेविका सुजाता उद्रेक, तसेच शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी गावातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

                 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आचल रामटेके, रक्षा रामटेके, काजल बोरकर आदींनी मोलाचे सहकार्य केले.