डॉ.बाबासाहेब आंबेडकराची धम्मक्रांती ही जगाची पुनर्रचना करणारी.‌. -समतादूत प्रज्ञा राजुरवाडे..

    रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर:-

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 अक्टूबर 1956 ला जी बौद्ध ध्म्म्मदीक्षा घेतली ही जगाच्या इतिहासातील अभुतपुर्व घटना आहे.विस्वाच्या शांतीचे प्रतिक आहे,बाबासाहेब यांचा धम्माकडे पाहन्याचा दुरदृष्टीकोन विश्वव्यापी आहे,डॉ बाबासाहेब आंबेडकरानी समाजरचनेच्या निर्मितीसाठी या जगाची पुनर्रचना व्हावी यासाठी धम्मक्रांती अशोक विजयादशमी या दिवशी केली असल्याचे प्रतिपादन समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी मार्गदर्शनपर केले.

              सम्राट अशोकांनी युध्दवीजयाचा मार्ग सोडून धम्मविजयाचा मार्ग स्वीकारला होता.तो जगाला प्रेरणादाई आहे असे इतिहासीक संबोधन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर सशोधन व प्रशिक्षण सस्था बार्टी पूणेच्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी खापरी धर्मू येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त अध्यक्षस्थानी मार्गदर्शनातून म्हणाल्यात.

         कर्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.प्रा.नरेंद्र मेश्राम,भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तथा वंचित बहूजन आघाडी चंद्रपुर जिल्हाचे सल्लागार नारायण कांबळे,पोलीस पाटील अंजली मेश्राम,सरपंच स्नेहा शेंडे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदिप रंदये हे होते.

           पुढे बोलतांना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या की डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी भारतीय समाज व्यवस्थेला समतेच्या पातळीवर आननारा लोकशाही शासन प्रनालीला पोषक होईल असा बुद्ध विचार स्वीकारुन बुधधम्म सांगीतला आहे.कुठल्याही प्रकारचे बुधाधम्मात शोषन मान्य नाही,उच्च निचता मान्य नाही,धम्मातील सदाचरण हे मोक्षप्राप्ती साठी नाही तर वर्तमान काळातिल इतरांचे व आपले जिवन सुखकर व्हावे यासाठी आहे,प्रज्ञा-शिल-करूणा-मैत्री,22 प्रतिज्ञा ह्या समाजात आणी देशात एकात्मता,बंधूभाव,समता न्याय प्रस्थापित करण्यासाठी आहे.

            तेव्हा,हा तथागताचा धम्म हा सामाजीक लोकशाही मार्गाने धम्मसत्ताकते मधून आदर्श राजसत्ता कशी निर्माण करता येईल यासाठी आहे.इथल्या प्रस्थापित सरकारनी आदर्श लोकशाही टीकवन्यासाठी धम्मप्रशिक्षण केंद्र उघडावे,पदवी शिक्षनात पाठ्यक्रमात बुधधम्म समाविस्ठ करावा,बुधधम्मीय पाठशाळा उभारल्या पाहिजे, यामुळे भारत देशाला नवी सृजन पिढी निर्माण करता येईल व जगाच्या मार्गदर्शनासाठी भारतीय व्यक्तिमतव निर्माण होतील.

           समर्थ असे भारतिय सविधान देवून डॉ बाबासाहेब आंबेडकरानी हे धम्मक्रांतीचे निदर्शन आहे हे जगासमोर आदर्श ठेवला आहे.तेव्हा हा तथागताचा धम्मरत्न पुढे नेण्यासाठी येथील राजकिय, साहितिक,प्राध्यापक विद्वत्तापूर्ण अधिकारी वर्ग,सशोधंक समाजीक वर्ग यांनी समतेच्या विचारांनी ऐकत्र येवुन बुधाधम्माच्या प्रचार व प्रसार कसा होईल यावर विचार सशोधंन करायला हवा असे सविस्तर मार्गदर्शन यावेळी बार्टी च्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी केले.

           या कार्यक्रमातंर्गत आभार प्रकाश मेश्राम यांनी मानले.