पिंपरी बुद्रुक गावच्या सरपंच पदी भाग्यश्री सुदर्शन बोडके यांची बिनविरोध निवड.

 

निरा नरसिंहपुर दिनांक :18

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

          ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुकच्या नूतन सरपंच पदावर भाग्यश्री बोडके यांनी पदभार घेतला.

         पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी दिनांक 18/ 9 /2023 रोजी निवडणूक झाली. त्या ठिकाणी नूतन सरपंच म्हणून भाग्यश्री सुदर्शन बोडके यांची बिनविरोध निवड झाली.

            निवडी प्रसंगी सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर बोलत आसताना भाग्यश्री बोडके म्हणाल्या की पिंपरी बुद्रुक गावच्या ग्रामस्थांचा व जनतेचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आसल्यामुळे मी आज सरपंच झाले. याचा मला आज आनंद आहे. इथून पुढे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे व माजी सरपंच श्रीकांत बोडके,नामदेव बोडके, सुदर्शन बोडके, व गावचे ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शना खाली पिंपरी गावचा विकास हा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवू व गोरगरीब मायबाप जनतेचा विसर कधीही पडू देणार नाही, शासनाच्या आनेक योजनेच्या माध्यमातून गावचा चौफेर विकास केल्याशिवाय गप्प बसणार नाही, सरपंच भाग्यश्री बोडके यांचे निवडी प्रसंगी उदगार..

         माजी सरपंच ज्योती श्रीकांत बोडके यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर ग्रामपंचायत सदस्याच्या उपस्थितीत सरपंच म्हणून भाग्यश्री बोडके यांची बिन विरोध निवड झाली.

         सदर निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी एस.बी.माने व सहाय्यक म्हणून जी ए लंबाते ग्रामसेवक यांनी कामकाज पाहिले.

           या निवडणुकी साठी माजी सरपंच ज्योती श्रीकांत बोडके, उपसरपंच पांडुरंग बोडके, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार, अनुराधा गायकवाड, सुनिता शेंडगे,        तलाठी भाऊसाहेब सुरज पाठमास , कृषी अधिकारी संदीप घुले , बावडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पाडण्यात आली.

           गेली 48 वर्षांपूर्वी याच बोडके कुटुंबातील माजी आदर्श सरपंच कैलासवासी,नारायण ईश्वरा बोडके यांनी 69 ते 73 साली गावची लोकसंख्या कमी आसल्यामुळे पाच वर्षाच्या कालावधीत 7 गावाची सरपंच पदाची जबाबदारी हाती घेऊन कारभार चालवीला होता.

         त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्यांच्या कुटुंबातील सोसायटीचे माजी चेअरमन सुदर्शन रघुनाथ बोडके यांच्या पत्नी भाग्यश्री सुदर्शन बोडके यांची दिनांक 18 /9 /2023 रोजी पिंपरी बुद्रुक गावच्या सरपंच पदाची जबाबदारी हाती आलेली आहे. .हे भाग्य केवळ,,माजी सरपंच श्रीकांत बोडके व नामदेव बोडके, यांच्या प्रयत्ना मुळेच घडुन आले.

        सरपंच पदाच्या निवडणुकी नंतर माजी सरपंच ज्योती बोडके, विद्यमान सरपंच भाग्यश्री बोडके, व नफिया नबीलाल शेख,तलाठी भाऊसाहेब ग्रामसेवक पोलीस अधिकारी कृषी अधिकारी व पत्रकार बांधव यांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

          या कार्यक्रमासाठी प्रमुख माजी विद्यमान सरपंच श्रीकांत बोडके,आनंता बोडके, बबन बोडके, प्रभाकर बोडके, रामचंद्र लावंड, आशोक बोडके, नामदेव बोडके , वर्धमान बोडके, हरिभाऊ सुतार , चांगदेव बोडके , सुदर्शन बोडके, रमेश मगर ,प्रवीण बोडके, शहाजीअण्णा बोडके ,बाळासाहेब घाडगे ,देविदास बोडके, दत्तूनाना बोडके, समाधान बोडके, नबीलाल शेख ,पोपट बोडके , व्यंकट बोडके ,आप्पासाहेब सुतार, जब्बार शेख ,चक्रधर सूर्यवंशी, सोमनाथ बोडके ,बलभीम पडळकर , भाऊ सूर्यवंशी ,बालाजी बोडके, मारुती सुतार ,बाप्पा मगर ,केशव बोडके ,भारत गायकवाड ,संजय गायकवाड ,आरून सूर्यवंशी , समाधान मगर ,राजेंद्र लावंड, सतीश बोडके ,गोरख रजपूत ,राहुल बोडके , राजेंद्र पाटील ,भारत गायकवाड , खुदाभय शेख ,तयब शेख , शंकर रणदिवे , संजय सुतार ,मयूर चौगुले ,भाऊ रनदिवे ,या सर्वांच्या उपस्थितीत सर्व पिंपरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.