वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर नागपूरला… — प्रा.अंजलीताई आंबेडकर उपस्थितांना करणार प्रशिक्षित.. — १९ व २० में रोजी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन..

 

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका

       मिशनरी पदाधिकारी व कार्यकर्ता हा पक्ष हिता बरोबरच सामाजिक दायित्वाला महत्त्व देत असतो.

       स्वतः बरोबर समाजाचे नुकसान होणार नाही असी कार्यपद्धत मिशनरी पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची असते.तद्वतच ते तत्वज्ञानाच्या कसोटीत खरे उतरत असतात.

       म्हणूनच वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर महानगर व ग्रामीणच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

         १९ में शुक्रवार व २० में शनिवार रोजी प्रशिक्षण असून प्रशिक्षणाचे स्थळ महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह,रेशिमबाग चौक,प्रेरणा काॅन्वेंटच्या बाजूला नागपूर असे आहे.

         पक्ष पदाधिकाऱ्यांना प्रा.अंजलीतीई प्रकाश आंबेडकर ह्या प्रशिक्षणाचे माध्यमातून प्रशिक्षित करणार आहेत.

         या प्रशिक्षण शिबीरात पुर्व विदर्भातील पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.