Home देशविदेश प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंती प्रित्यर्थ व्याख्यानाचे आयोजन……

प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंती प्रित्यर्थ व्याख्यानाचे आयोजन……

 प्रेम गावंडे 

 उपसंपादक 

दखल न्युज भारत 

         समता सैनिक दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीस वर्षे मानवमुक्तीचे लढे समता सैनिक दलाच्या भरवश्यावर विश्वभूषण महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले सामाजिक संघटन म्हणजे लढले. समता सैनिक दलाला शंभर वर्षे पूर्ण होत असून शतक महोत्सवानिमित्त चंद्रपूर येथे समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समिती गठीत करण्यात आली आहे.

       समितीचे अध्यक्ष दिलीप वावरे, उपाध्यक्ष धम्मदीप मेश्राम व ॲड. राजेश वनकर, कार्याध्यक्ष गौतम येसांबरे, सचिव अनंत बाबरे, सहसचिव गौरव धाकडे, कोषाध्यक्ष मार्शल अमर्त्य, सह-कोषाध्यक्ष रुपेश वालकोंडे, मिडिया प्रमुख निखिल येसांबरे अश्या सर्वानुमते नियुक्त्या करण्यात आल्या. सदर समितीतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन होणार असून दिनांक २२ मार्च २०२६ ला चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती च्या निमित्ताने भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

          चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी अखंड भारतात आपल्या शौर्याच्या बळावर सत्ता प्रस्थापित केली होती. कलिंग युद्धानंतर विजय संपादन करूनही झालेली जीव हानी पाहून शोकाकुल होऊन युद्ध त्यागणारा आणि अहिंसा व शांतीचे पुरस्कार करणारा बुद्ध धम्माचा स्वीकार केला, संपूर्ण विश्वात बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला, सोबतच सर्व धर्मियांना समान आणि मानवतेची वागणूक दिली.

       अश्या महान सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्तने महेंद्र शेगावकर बौद्ध कालीन इतिहासकार तज्ञ, लेणी तथा शिल्पकला तज्ञ, यांना “प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंती प्रित्यर्थ त्यांच्या जीवनावर” व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

       कार्यक्रमाचे उदघाटक ज्येष्ठ मार्शल गौरीशंकर टिपले, राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल कॅप्टन अशोक खन्नाडे, मार्शल रंजना वासे असून कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप वावरे हे राहणार आहेत. सदर व्याखानाचा भव्य कार्यक्रम प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे सायंकाळी ५.३० वाजता पासून सुरू होणार आहे. करिता समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समिती तर्फे संपूर्ण चंद्रपुरातील जागृत आणि बुद्धिवंत जनतेस आवाहन करण्यात येत आहे की सदर नियोजित कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवावी आणि कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे.

               तसेच शताब्दी महोत्सवाचा अंतिम टप्पा म्हणजे दिनांक १३ मार्च २०२७ राहणार असून चंद्रपूरकरांनी तन मन धनाने समता सैनिक दल शताब्दी महोत्सव समितीस सहकार्य करावे, अशी समितीच्या वतीने विनंती केली आहे.