Home Political आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस…. — मतदारांच्या अस्तित्वाची निवडणूक…

आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस…. — मतदारांच्या अस्तित्वाची निवडणूक…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

      महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून ३ वाजता पर्यंतची अंतीम मुदत आहे.

       १४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक व निवडणुका होत आहेत.या निवडणूकातंर्गत २ डिसेंबरला मतदान होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल पुढे येणार आहेत.

           विविध पक्षांच्या एबी फार्म नुसार निवडणूक लढणाऱ्यांची चढाओढ दिसली.पण,पक्षांकडून व स्वतंत्र (अपक्ष) निवडणूक लढण्याची इच्छा पूर्ण करणाऱ्यांची संख्या आज रात्रो पर्यंत कळेल..

          नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूका स्थानिक पातळीवर महत्त्वपूर्ण मानल्या जातात.गावकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा प्रत्येक उमेदवारांची असते.

       मात्र,मतदार कधी सत्ता पक्षाच्या उमेदवारांना महत्व देतात तर कधी विरोधी पक्षाच्या!,कुठे अपक्ष उमेदवारांना मतदान महत्व देतात.

        पण,विशेषतः पक्ष,जात पाहून,उमेदवारांचे कामे बघून,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार मत देतात.कधीकधी हवा पाहून तिवा मांडणारे मतदार असतात..

          परंतु नामनिर्देशन पत्र कुणाचे पात्र ठरणार आहेत याकडे स्थानिक नागरिकांचे प्रथमतः लक्ष असणार आहे.

       या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने कळणार आहे की मतदार जाणकार आहेत की गाफील आहेत,धर्मवेळे आहेत की अधिकाराप्रती जागरूक आहेत,कर्तव्यदक्ष आहेत की विकावू आहेत,स्वतःच्या अधिकारांना वाचविणारे आहेत की स्वतःचे अस्तित्व चंद रुपयांसाठी नाकारणारे आहेत,लोकशाहीचे रक्षणकरणारे आहेत की स्वतःला गुलाम बनविणारे आहेत…