Home Social लक्ष्मी नरसिंहकडे जाणाऱ्या बी के बी एन राज्य मार्गावर काटेरी झुडपांचा विळखा,नागरिक...

लक्ष्मी नरसिंहकडे जाणाऱ्या बी के बी एन राज्य मार्गावर काटेरी झुडपांचा विळखा,नागरिक व भाविक त्रस्त…  — बांधकाम खात्याने याकडे लक्ष देऊन काटेरी कुंपण काढावे,भाविक व ग्रामस्थांची मागणी…

 बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी…

      निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील बी के बी एन राज्यमार्ग बावडा ते नरसिंहपुर दरम्यान प्रमुख रस्ता सध्या काटेरी झुडपांच्या विळख्यात सापडला असून,या मार्गावरून ये-जा करणारे लक्ष्मी नरसिंहाचे भाविक भक्त नागरिक,शालेय विद्यार्थी आणि ऊस वाहतूक वाहन चालक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

      रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला असून,वाहनांना एकमेकांना ओव्हरटेक करणेही कठीण झाले आहे. 

       विशेषतः रात्रीच्या वेळी कमी दिसण्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.याशिवाय झुडपांमध्ये लपून साप,यांसारखे वन्यप्राणीही दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

          शालेय विद्यार्थ्यांना दररोज याच रस्त्याने शाळेत जावे लागते.यामुळे पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.काही वेळा काट्यांमुळे वाहनांचे टायर फुटणे, दुचाकीस्वारांचा तोल जाऊन पडणे अशी प्रकरणे घडत आहेत. 

       स्थानिक नागरिकांची मागणी आहे कि, रस्त्याच्या दुतर्फा झुडपे तातडीने कापण्यात यावीत.रस्त्याची नियमित देखभाल व्हावी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

         लक्ष्मी नरसिंहाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक या मार्गाने जात असतात, याबद्दल या भागातील ग्रामस्थांच्या वतीने काटेरी कुंपण काढण्यासाठी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत..

         ज्येष्ठ नागरिक प्रभाकर बोडके,माजी चेअरमन बबनदादा बोडके,संचालक श्रीकांत बोडके,संचालक संजय बोडके,संचालक राजेंद्र मोहिते,सरपंच भाग्यश्री बोडके,सरपंच नितीन सरवदे,माजी सरपंच नरहरी काळे,सरपंच सुदर्शन बोडके,उपसरपंच संतोष सुतार,माजी चेअरमन निलेश बोडके,माजी सरपंच आबासो बोडके,माजी सरपंच पांडूदादा बोडके,मा.सरपंच विलास ताटे,माजी सरपंच जगदीश सुतार, मा.सरपंच विठ्ठल देशमुख,सरपंच दादासाहेब क्षिरसागर,सरपंच सोमनाथ मोहिते,मारुती मोहिते,सरपंच तेजस मोहन मोहिते, माजी सरपंच राजेंद्र मोहिते,माजी सरपंच शितल मोहिते,माजी सरपंच समीर मोहिते,माजी सरपंच श्रीकांत दंडवते,पोलीस पाटील शरद जगदाळे,पोलीस पाटील वर्धमान बोडके,मा.सरपंच चंद्रकांत सरवदे,माजी सरपंच आनंद काकडे,उद्योजक विजय सरवदे,तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राऊत,माजी सरपंच संतोष मोरे,पैलवान सचिव कदम,माजी सरपंच आशोक बळते,महावीर जगताप,पांडुरंग मोहिते,विनोद मोहिते,

        जर वेळेवर झुडप हटवण्याची कारवाई झाली नाही,तर स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.