घटस्थापना, भागवत शोभायात्रा काढुन नवदुर्गा महोत्सवाचा शुभारंभ… — सोमवार (दि.१६ ते २२) ऑक्टोंबर दु.३ ते सायं . ८ वाजे पर्यंत श्रीमद् भागवत व देवी महात्मेय…

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

कन्हान : – राज राजेश्वरी दुर्गा माता मंदिर सेवा चॅरि टेबल ट्रस्ट धरम नगर कन्हान द्वारे घटस्थापना, भाग वत शोभायात्रा काढुन नवदुर्गा महोत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला.

         रविवार (दि.१५) ऑक्टोंबर ला सायंकाळी ७ वाजता राज राजेश्वरी दुर्गा माता मंदिरात विधिवत पूजा अर्चना, आरती करुन घटस्थापना करून दुसऱ्या दिवशी सोमवार (दि.१६) ला चंद्रशेखर पडोळे यांचे निवासस्थानी विधिवत पूजा अर्चना करुन कलश मध्ये पाणी भरुन महिलांनी डोक्यावर कलश घेऊन आणि कथा व्यास प्रेममुर्ति आचार्य संजय कृष्ण मिश्रजी यांचा बग्गी मध्ये स्वागत करुन ढोल ताशाच्या मधुर सुरावात भागवत शोभायात्रा काढण्यात आली.

          ही शोभायात्रा गणेश नगर, पांधन रोड ने राष्ट्रीय महामार्गा वरील आंबेडकर चौक ते गांधी चौक भ्रमण करुन पर त आंबेडकर चौक ते राज राजेश्वरी दुर्गा माता मंदिर धरम नगर कन्हान पोहचुन शोभायात्रेचे समापन करण्यात आले.

       यावेळी नागरिकांनी कलशधारी महिलांचे पाय धुऊन अक्षदा लावुन फुलाच्या वर्षाने, फळ वितर ण करित जोरदार स्वागत केले. सायंकाळी ४ वाजता श्रीमद् भागवत कथा आणि देवी महात्मेयची सुरवात करून सतत आठ दिवस सोमवार (दि.२२) ऑक्टोंबर दु.३ ते ८ वाजे पर्यंत कथा व्यास आचार्य संजय कृष्ण मिश्रजी च्या सुमधुर वाणीने होणार आहे. तसेच विवि ध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सोमवार (दि.२३) ऑक्टोंबर ला महाप्रसाद कार्यक्रम, मंगळवार (दि.२४) ऑक्टोंबर ला कन्हान काली मंदिर नदी काठावर घट विर्सजन करुन महोत्वाची सांगता करण्यात येईल.