तालुक्यातील चेकबरांज येथे महसूल हद्दीतून विना परवाना गौण खनिज संपत्तिची वाहतूक… — कारवाई करण्याची मागणी – राजू डोंगे संचालक कृ. ऊ. बा. स. भद्रावती तथा उपसरपंच ग्रा. प. चेकबरांज 

 

उमेश कांबळे ता प्र भद्रावती

     भद्रावती तालुक्यातील चेकबरांज येथे महसूल हद्दीतील गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक सुरू असून ही वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी चेकबरांज ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू डोंगे यांनी एका निवेदनाद्वारे भद्रावती तहसीलदारांकडे केली आहे.

डोंगे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गेल्या काही महिन्यांपासून चेकबरांज महसूल हद्दीतून एम्टा खाणीतील ओ. बी. रेती व मुरूम यांची अवैधरित्या ट्रॅक्टर व ट्रक या वाहनांद्वारे सर्रासपने वाहतूक केल्या जात आहे. सदर महसूली क्षेत्र हे कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन च्या नावाने वर्ग झाले आहे. अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडे कुठल्याही प्रकारची गौण खनिज उत्खननाची परवानगी नाही. तरीदेखील गौण खनिजांची दिवस-रात्र वाहतूक सुरू आहे. सदर वाहतूक करणारी वाहने ही चेकबरांज गावातून जात असताना अतिशय वेगवान गतीने जात असतात. त्यामुळे चेकबरांज गावातील नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. सदर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व त्यांच्या मालकांवर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी तहसीलदार भद्रावती यांना निवेदनातून करण्यात आली आहे.