कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-आज शुक्रवार दिनांक १६/०६/२०२३ रोजी मौजा साटक येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत भात पीक प्रात्यक्षिक (यांत्रिक पध्दत) चे धान आणि तूर बियाणे वाटप करण्यात आले ,,तसेच यावेळी शेतीशाळा वर्ग घेऊन उपस्थित महिला शेतकऱ्यांना पावसाचा विलंब झाल्यास वाणाची निवड तसेच त्या अनुषंगाने पीक पद्धतीचा वापर, 3 टक्के मिठाची बीजप्रक्रिया, गादी वाफ्यावर रोप टाकणे तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली, यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री.जी बी.वाघ , कृषी सहायक श्री.के.बी.ठोंबरे ,सरपंच श्री तरुनकुमार बर्वे व महिला शेतकरी उपस्थित होत्या.