डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
अहेरी
येचली अवैध रेतीसाठा प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईसह या प्रकाराला मूक संमेती देणा-या अधिकारी, कर्मचा-याना निलंबित करण्याच्या मागणीला घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी आमरण उपोषण पुकारले आहे. दरम्यान उपोषणाच्या तिस-या दिवशी आज, 16 जून रोजी उद्धव बाळासाहेब शिवसेना गडचिरोली वाहतूक सेना चे पदाधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट दिली. सदर प्रकरणात संबंधितांवर कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
भामरागड तालुक्यातील येचली नदी घाटातील रेतीची उचल न करताच बनावट दस्ताऐवजाच्या आधारे येथील रेतीचा नवनिर्माणाधिकन कामात वापर करणे, अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करुन शासनाला कोट्यावधी रुपयाचा चूना लावल्याचा आरोप करीत सामाजिक ताटीकोंडावार यांनी वेळोवळी तक्रार, निवेदन सादर करीत या प्रकरणातील दोषी कंत्राटदार तसेच संबंधित अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र वरिष्ठ स्तरावरुन कोणतीही कारवाई न झाल्याने सबंधित दोषी अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारावर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाईच्या मागण्यांना घेऊन त्यांनी 14 जूनपासून अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले आहे.
तीव्र उकाड्यात सदर आंदोलन आज, शुक्रवारी तिस-या दिवसीही सुरु आहे. दरम्यान आज खा. अशोक नेते यांनी उपोषण स्थळाला भेट देत उपोषणकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच सदर प्रकरणी आपण स्वत:हून लक्ष घालणार असून प्रशासनातील वरिष्ठांशी चर्चा करुन कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सुनील कुमार कांचनलाल वासनिक यांचेसह शिवसेनाने चे तालुका प्रमुख प्रफुल येरणे. रवी कप्पलवार. सायमान शांती प्रकाश लकरा. मयूर चिंतवार. गणेश यशवंत तायडे. योगेश दुर्गे. अजय ठाकरे उपस्थित होते.