राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप….

     रोहन आदेवार

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ/ वर्धा

वर्धा: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संलग्नित आर.टी. एम. टेक्निकल अँड एज्युकेशन सोसायटी संचालित कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा, ‘विकसित युवक- विकसित भारत’ व मतदार जनजागृती अभिमान या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण श्रम संस्कार शिबिराचे दि.०९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान टाकळी(झडशी) येथे आयोजित करण्यात आले होते.

             या ग्रामीण श्रम संस्कार शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलन-जादूटोणा विरोधी कायदा, सायबर सुरक्षा आणि युवक, पर्यावरण, शिक्षण, मतदार जनजागृती, योगाभ्यास, नैसर्गिक संसाधन व संवर्धन, ग्राम स्वच्छता, सर्वांगीण ग्रामीण विकास, आपत्ती व्यवस्थापन, पशुरोग निदान, बालविवाह या विषयावर जनजागृती करण्यात आली.

            निरोप समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.चंदू पोपटकर, प्रमुख पाहुणे प्रा.सुनील तोतडे, प्रा.सतीश धवड, प्रा.डाँ अशोक सातपुते, प्रा.विलास बैले, डॉ.महादेव चुंचे, प्रा.विशाखा मानकर, विशेष अतिथी प्रा.उमेश उईके, प्रा.किशोर ढोबळे, प्रा.नरेश पाटील, डॉ.रामेश्वर होडकर, प्रा.गजानन जाधव उपस्थित होते.

                 या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण प्रा. डॉ.चंदु पोपटकर सरांनी केले. त्यांनी विद्यार्थी जीवनात शिबिराचे महत्व पटवून दिले. जीवनात जगण्याचा दृष्टीकोण, जीवनाकडे बघण्याचे नवीन ध्येय तुमच्या मनात निर्माण झाले असेल तर ती शिबिराची यशस्वीता आहे असे सांगितले. त्यासोबतच प्रा.किशोर ढोबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालत त्यांचा आत्मविश्वास उंचावला. प्रास्ताविक भाषणात कार्यक्रम अधिकारी प्रा.डाँ.अशोक सातपुते यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करत समाज कार्याबद्दलचे महत्व विषद करत या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळते असे सांगितले. 

               या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल ईटेकर तर आभार प्रदर्शन भारती शेळके यांनी केले. या शिबिराबद्दल प्रशांत मानमोडे, तेजस्विनी ठाकरे, रोहन आदेवार, तेजस्विनी ढोबळे, अस्मिता पाटील या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.