Home Political अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते कुंभारगावच्या नवनिर्वाचित सरपंच ॲड.स्नेहलताई धुमाळ यांचा सत्कार…

अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते कुंभारगावच्या नवनिर्वाचित सरपंच ॲड.स्नेहलताई धुमाळ यांचा सत्कार…

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

    कुंभारगाव ग्रामपंचायत सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते ॲड. स्नेहलताई दत्तात्रय धुमाळ यांचा सत्कार करून पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

           अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की, शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असते.राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न होत आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या भूमिकेतून शासकीय योजनेचा लाभ सर्वापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहावे. सरपंच ॲड. स्नेहलताई धुमाळ यांच्या पुढील भावी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

   यावेळी माजी उपसरपंच कुंडलिक धुमाळ, उपसरपंच सौ स्वातीताई उदय भोईटे, उदयशेठ भोईटे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल लोंढे, ग्रामपंचायत सदस्य सचिन गोरे, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवगिरे, , लक्ष्मी का सोसायटी चेअरमन काशिनाथ धुमाळ, व्हाईस चेअरमन प्रमोद धुमाळ, माऊली डोळे, दत्तू (आबा) धुमाळ, तसेच प्रसंगी कर्मयोगी कारखान्याचे संचालक भिगवण चे माजी सरपंच पराग जाधव, पंचायत समिती उपसभापती संजय भाऊ देहाडे, भिगवण ग्रामपंचायत सदस्य श्री शेख व कपिल भाकरे उपस्थित होते.