अबोदनगो एस.चव्हाण
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती :- गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या दुचाकी चोरीचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत शहर गुन्हे शाखेने एकाला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली अॅक्टीवा मोपेड आणि मोबाईल असा एकूण ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घटना अशी की, दिनांक ०४ मे २०२५ रोजी एका महिलेनं गाडगेनगर पो.स्टे.मध्ये फिर्याद दिली होती. त्या अष्टविनायक मेडिकल, राठी नगर या दुकानासमोर त्यांची अॅक्टीवा (MH-27 DP 4029) लावून दुकानात गेल्या असताना, गाडीला चावी असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं मोपेड तसेच डिकीत ठेवलेला मोबाईल असा माल लंपास केला. या प्रकरणी कलम ३०५(अ) भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल झाला.
पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकानने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला. शेवटी शेख मोहसीन शेख इब्राहीम (३४), रा. पठाण चौक, सिद्दिकी मदरसा परिसर, अमरावती याला ताब्यात घेण्यात आले. त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून १) अॅक्टीवा मोपेड (MH-27 DP 4029) किंमत सुमारे ४५,००० रु, २) रेडमी कंपनीचा मोबाईल — किंमत १,००० रु. असा एकूण मुद्देमाल ४६,००० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. अरविंद चावरीया, उपायुक्त श्री. गणेश शिंदे, उपायुक्त श्री. रमेश धुमाळ, उपायुक्त श्री. शाम घूगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई पो.नि. संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सपोनि अनिकेत कासार (सायबर), सपोनि प्रियंका कोटावार (सायबर), अंमलदार दिपक सुंदरकर, जहीर शेख, संग्राम भोजने, सुरज चव्हाण, राजीक रायलीवले, निखील गेडाम व सुषमा आठवले (सायबर) यांच्या पथकाने केली.

