Home Social गडचिरोलीत जात प्रमाणपत्र तपासणी समिती स्थलांतर प्रकरणावर आमदार रामदास मसराम यांचा पाठपुरावा…

गडचिरोलीत जात प्रमाणपत्र तपासणी समिती स्थलांतर प्रकरणावर आमदार रामदास मसराम यांचा पाठपुरावा…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी 

         गडचिरोली येथील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे अधिकारी व दक्षता कोरम यांना किनवट-2 येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार रामदासजी मसराम (आरमोरी) यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्य सचिव श्री. राजेशकुमार मीना यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली.

       या भेटीत आमदार मसराम यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल असल्याने येथील जात प्रमाणपत्र तपासणी समिती कायम ठेवणे अत्यावश्यक आहे, असे ठळकपणे मांडले. तसेच, समितीचे अधिकारी व दक्षता कोरम किनवट-2 येथे स्थलांतरित केल्यास जिल्ह्यात तीव्र असंतोष निर्माण होईल आणि जनतेत नाराजी पसरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावर 

       मुख्य सचिव श्री मीना यांनी आमदार मसराम यांचे निवेदन स्वीकारून विषय गांभीर्याने तपासण्याचे आश्वासन दिले.

         या भेटीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून, जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे अधिकारी व कोरम चे स्थलांतरण झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असेही स्पष्टपणे भूमिका घेण्यात आली.