आज कांग्रेस पक्षाचा चिमूर येथे महत्वपूर्ण कार्यकर्ता मेळावा… — प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व विधानसभा विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार कार्यक्रमाचे मुख्य केंद्र… — रक्तदान शिबिरासह विविध उपक्रमांने होणार डॉ.सतिश वारजूकर यांचा वाढदिवस साजरा….

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

        वृत्त संपादीका 

      अरमान बारसागडे 

  तालुका प्रतिनिधी चिमूर 

             चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे उपाध्यक्ष डॉ.सतिश वारजूकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चिमूर क्रांती भूमीत आज राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

          या कार्यकर्ता मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असणार आहेत तर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार मुख्य मार्गदर्शक अतिथी असणार आहेत.

                याचबरोबर या कार्यक्रमाला आजिमाजी आमदार व माजी आमदार तथा माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष डॉ.अविनाश वारजूकर हे विशेष अतिथी म्हणून असणार आहेत.

          आज डॉ.सतिश वारजूकर यांचा वाढदिवस असून त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन चिमूर येथे करण्यात आले आहे.तद्वतच त्यांचा वाढदिवस विविध ठिकाणी विविध उपक्रमांतर्गत पार पाडला जाणार आहे. 

            आज चिमूर येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे तालुका पदाधिकारी,गाव स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्तागण जिकरीने कामाला लागले आहेत.

            राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे सरचिटणीस धनराज मुंगले,चिमूर तालुका अध्यक्ष विजय गावंडे,चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस तथा माजी जि.प.सदस्य गजानन बुटके,तालुका सरचिटणीस विलास मोहिनकर यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यास असंख्य संख्येने उपस्थित राहावे याबाबत आव्हान केले आहे..