नेरी वासियांचा पारंपारिक नंदीबैल पोळा उत्साहात संपन्न… — नेरीकर शांत व सौदार्यपुर्वक जिवन जगणारे! 

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

      वृत्त संपादीका 

    कार्यक्षेत्र भारत देश

    दखल न्यूज भारत 

            चिमूर तालुकातंर्गत मौजा नेरी हा गाव शेतकरी व शेतमजूरांचा…

           घनदाट असलेल्या वस्तीतील नेरीकर शांत आहेत व सौदार्यपुर्वक वातावरणात आयुष्य जगताना,”एकमेका सहाय्य करु,अवघे धरु सुपंथ,…या म्हणी प्रमाणे जिवनक्रम नेहमी पुढे आणतात…याचा अभिमान मला तरी आहे.

            कारण १७ सदस्यीय नेरी ग्रामपंचायतची पाच वर्ष मी सरपंच असताना मला बरेच कटू व सकारात्मक अनुभव आलेत.मात्र दोन्ही प्रकारच्या अनुभवांनी मला बरेच कार्यक्षम व सक्षम केले हे विसरता येत नाही.यामुळे नेरी करांची मी अंतकरण पुर्वक सदैव ऋणी असणार आहे.

          तद्वतच पाच वर्ष सरपंच असताना,नेरीवासीय शेतकऱ्यांचा बैलपोळा व नंदीबैल पोळा संबंधाने पारंपरिक पद्धतीने पाच वर्ष सातत्याने विधिवत पूजा करण्याचे भाग्य मला प्राप्त झाले होते.

         नेरी मध्ये खेळीमेळीच्या वातावरणात बैल पोळा व नंदीबैल पोळा उत्साहात पार पडला जातो.या उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी सुद्धा नेरीकर घेतात हे महत्वाचे आहे.

             यावर्षी सुद्धा नेरी येथे बैल पोळा व नंदीबैल पोळा अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.पोळ्या निमित्ताने एकमेकांच्या मनमोकळ्या बैठकी होतात व बैठकी अंतर्गत सुखदुःखाच्या आणि शेतीसंबंधातील चर्चा सकारात्मक होतात व या चर्चा बऱ्याच पैकी एकमेकांचा सहारा बनवतात,हे नेरीवासीयांचे विशेषत्व आहे.

               यावर्षी नेरीच्या प्रथम नागरिक सरपंच पिसेताई,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व इतर प्रतिष्ठित नागरिकांनी बैल पोळा व नंदीबैल पोळा यांची विधीवत पुजा केली..आणि बैल पोळा व नंदीबैल पोळा उत्साहाला सुरुवात झाली.

            अलोट गर्दीत पार पडणारा बैल पोळा व नंदीबैल पोळा नेरी वासियांसाठी महत्वपुर्ण पारंपरिक सण असून दोन दिवस चालणारा हा सण उत्सवात बदल करतो व आनंददायी वातावरणात संपन्न होतो.

          म्हणूनच बैल पोळा व नंदीबैल पोळा हा शेतकऱ्यांचा सण अनेक कार्यपद्धतीचे लौकिक वर्णन करतो.