जि प शाळेतील विद्यार्थ्यांनी कु अनुष्का गडलिंग शासनाच्या शिष्यवृत्तीस पात्र..

 

 

युवराज डोंगरे/खल्लार 

  उपसंपादक

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वाकपूर दादापूर येथील इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का धनराज गडलिंग हिने सत्र २०२२-२३ मधे शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. त्या परीक्षेत तिने घवघवीत संपादन केले. त्यामुळे ती शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. तिला शासनातर्फे शिष्यवृत्ती मिळणार आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 तिने मिळविलेल्या यशाबद्दल प्रकाश नाटकर गटविकास अधिकारी, प्रमिला शेंडे गटशिक्षणाधिकारी, प्रधान मंत्री पोषण आहार योजना अधीक्षक तथा केंद्रप्रमुख कल्पना ठाकरे, किरण ढवळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती वाकपुर, दीपक गडलिंग, रामेश्वर गडलिंग राजुभाऊ सोनोने पोलीस पाटील, गौतम गडलिंग ग्राम पंचायत सदस्य, यांनी विद्यार्थिनी, पालक व मुख्याद्यापक आणि शिक्षक यांचेही कौतुक केले आहे .

            ती आपल्या यशाचे श्रेय आपले इयत्ता ५ वी चे वर्गशिक्षक सुरज मंडे सर शाळेतील सहाय्यक शिक्षिका अर्चना सरोदे इयत्ता पहिलीला शिकवणारे रमेश राठोड सर यांना देते त्याचप्रमाणे तिला अभ्यासात सहकार्य करणारे, नंदिनी गडलिंग, अभिषेक ढवळे, आश्विन गडलिंग, यांचे सहकार्य लाभल्याबद्दल ची भावना व्यक्त करते. वाकपूर शाळेतील ती पहिली विद्यार्थिनी आहे जी शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. लहानशा गावातील शाळेमधून अनुष्काने हे यश संपादन केल्याबद्दल तिचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.