जि. प. प्राथमिक मराठी शाळा वाकपुर दादापुर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. 

 

 

युवराज डोंगरे 

उपसंपादक

खल्लार जि प प्राथमिक मराठी शाळा वाकपुर दादापुर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम करिता एरंडगावं गट-ग्रामपंचायत चे प्रथम महिला नागरिक सौ. मायाताई राजुभाऊ घोडे सरपंच यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे माजी प.स. उपसभापती राजुभाउ घोडे, माजी सरपंच चंद्रशेखर तायडे, संदीप भले उपसरपंच, किरण ढवळे अध्यक्ष व्यवस्थापन समिती वाकपुर, पोलिस पाटील राजुभाऊ सोनोणे, गौतमराव गडलिंग सदस्य ग्रामपंच्यायत, वैशाली गाभने, सुनीता बंड ग्रामपंच्यायत सदस्य, नंदकिशोर कराळे, सूरज मंडे मुख्याध्यापक यांचे प्रमुख उपस्थिती पार पडला.

 कार्यक्रमाचे सुरवातीला महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. शाळेचा विद्यार्थी प्रतीक सोनोने याने स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. भारत माता की जय च्या घोषनेने शालेय परिसर दुमदुमली गेला होता. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे व नागरिकांचे आणि संपूर्ण गावाचे आरोग्य चांगले राहावे याकरिता प्रत्येक कुटुंबाला एक याप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे शुभ हस्ते ग्रामपंच्यायत चे वतीने कचरा पेटी चे विद्यार्थी व पालकांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू अर्चना सरोदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक कू.ज्योत्स्ना इसळ, प्रशांत सापाने , रामेश्वर गडलिंग, रंजनाताई गडलिंग अंगणवाडी सेविका, शुभम वैद्य ऑपरेटर, अनिल सोनोने, दिपक गडलिंग, मंदाबाई ढवळे, अतुल कराळे, आशिष बारसे, राजुभाऊ ढवळे, अवधुत मोहोड, जगदीश गावंडे, रवींद्र गोंडाने, दामोधर स्थूल, सुरेश मोहोड, संगेश गोंडाणें, सुनील मोहोड, विकी ढवळे, अविनाश बंड, आकाश गवई, धम्मदिप ढवळे, आश्विन गडलिंग, गणेश पवार, कांचन पवार, भारत पवार, देवचंद पवार, सार्थक गडलिंग, ऋषित पवार, अर्तेश पवार, तसेच या प्रसंगी गावातील इतर गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.