वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडेंवर कारवाई करा.. –अ.भा. माळी महासंघ शाखा साकोली यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी…  

 

संजय टेंभुर्णे

कार्यकारी संपादक

दखल न्युज भारत 

           स्री शिक्षणाचे जनक ,थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले व महात्मा गांधी यांच्या बद्दल कायम अपमानकारक व अपशब्द बोलून गरळ ओकणा-या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या विकृत मनोवृत्तीचा निषेध करण्यासाठी आणि यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही व विविध ठिकाणी यांचे होणारे कार्यक्रम रद्द करुन आयोजकांवर गुन्हे दाखल करावे. अशा आशयाचे निवेदन तहसिल साकोली मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यासाठी अ.भा.माळी महासंघ तालुका शाखा साकोलीच्या वतीने देण्यात आले.

         यावेळी प्रदेश संघटक वेणूगोपाल शेंडे,अ.भा.माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डाॕ.श्रीकांत भुसारी , अ.भा.माळी महासंघ साकोली चे अध्यक्ष अनिल किरणापूरे , पंचायत समिती सभापती गणेश आदे पं.स.सदस्या छाया खर्डेकर,पं.स.सदस्या शालु नागरीकर ,सानगडीच्या सरपंचा सविता उप्रिकर ,सरपंचा पुजा देशमुख ,सरपंच योगराज गोटेफोडे ,सरपंचा दयावती उपरीकर ,सामाजिक कार्येकर्ते यशवंत उपरीकर ,लालचंद लोथे,रविंद्र खंडाळकर,केतन बारस्कर,गोवर्धन इठवले,दिपक उपरीकर ,उमेश देशमुख ,चंद्रभान खंडाळकर ,गुरुदेव श्रीरंगे,चंद्रशेखर उमाळे,विलास नंदूरकर,हरगोविंद भेंडारकर,नरेश खर्डेकर,गिरीधर गायधने ,ओमराज डोंगरवार ,बबन राऊत ,यशवंत चोपकर, गजू बनकर, दीपक बनकर, अविनाश बनकर, यावेळी उपस्थित होते .