नंदोरी टोल प्लाजा व्यवस्थापकावर कार्यवाही करण्याचे पालकमंत्र्याचे आदेश. राज्य महामार्ग दुरुस्तीकडे दुर्लक्ष. आकाश वानखेडे यांनी पालकमंत्र्याकडे केली होती तक्रार. 

 

 

उमेश कांबळे ता प्र भद्रावती –

 

आनंदवन ते आसिफाबाद हा राज्य महामार्ग गेल्या काही महिन्यापासून जागोजागी उखडला होता , त्यामुळे कित्येक अपघात होऊन अनेक जण जखमी तर काहींचा मृत्यूही झाला. या राज्य महामार्गाची दुरुस्ती करण्याची सर्वस्वी जबाबदारी डब्लू सी बी टी आर टोल प्लाझा नंदोरी यांची आहे परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने या टोल प्लाजा ची तक्रार भाजपा जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी पालकमंत्र्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन टोल प्लाजा नंदोरीची योग्य ती तपासणी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले आहे. आनंदवन ते आसिफाबाद या दुहेरी राज्य महामार्गाचे टोल वसुली व देखभाल दुरुस्तीचे कंत्राट डब्लू सी बी टी आर टोल प्लाझा नंदोरी यांना देण्यात आले . गेल्या काही महिन्यापासून कित्येक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले तर काही ठिकाणचा रस्ता दबला आहे. हा प्रकाराबाबत डब्ल्यू सीबीटीआर टोल प्लाजा व्यवस्थापक यांना निवेदन सुद्धा देण्यात आले. परंतु या महामार्ग दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने या प्रकाराची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला टोल प्लाझा वर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.