सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कडक कारवाई.:- ठाणेदार चंद्रकला मेसरे..

 

युवराज डोंगरे/खल्लार

      उपसंपादक

      काही दिवसांपासून सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करुन समाजातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम काही समाजकंटकाकडून होत आहे.सोशल मिडियात अफवा पसरविणारे मेसेज,पोस्ट व्हायरल करण्याच्या घटना घडत आहेत.

        याच पार्श्वभूमीवर खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना खल्लारच्या ठाणेदार चंद्रकला मेसरे यांनी आवाहन केले आहे की दोन जाती धर्मात तणाव निर्माण होईल तसेच कोणत्याही महापुरुषांची बदनामी होईल अशा अपमान करणाऱ्या पोस्ट,मेसेज व्हाट्स अप, फेसबुक,ट्विटर,इंस्टाग्राम यासारख्या सोशल मिडियावर टाकू नयेत व फारवर्डही करु नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

       अशा पोस्ट किंवा मेसेज टाकणाऱ्या समाजकंटाकावर खल्लार पोलिस लक्ष ठेऊन आहेत.अशा पोस्ट सोशल मिडियावर टाकल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्याचा इशारा खल्लारच्या ठाणेदार चंद्रकला मेसरे यांनी खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना दिला आहे.