कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील पश्चिमेस ८ कि.मि.अंतरावरिल वार्ड नंबर दोन निंबा येथे राहणारे श्री.बंडु शालिक ठाकरे वय ५६ वर्ष यांना अति तंबाखु च्या सेवनामुळे कॅन्सर सारखा आजार झाला होता.
कॅन्सर सारखा गंभीर आजार जळल्याने श्री.बंडु ठाकरे यांच्यासाठी हा आजार कर्दनकाळ ठरला.त्या आजारामुळे श्री.बंडु ठाकरे चिंताग्रस्त होत.
गावातच ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वार्ड क्रमांक दोन मधील विहिरित उड़ी मारून श्री.बंडू ठाकरे यांनी आत्महत्या केली.
ही घटना पारशिवनी तालुक्यातील निंबा येथे घडली.मृतक बंडु शालिक ठाकरे असे मृतकाचे नाव आहे.निबां गावात वार्ड नं दोन भागात बंडु ठाकरे यांच घर आहे.
कॅन्सर सारख्या आजारीची चिंता त्यांच्या आत्महत्येतून पुढे आली.परिणामी त्यांनी दिनांक १४ में च्या रात्री उड़ी मारून आत्महत्या केली.त्याचा शोध ठिकठिकाणी घेतले असता ते मिळाले नाही.शेवटी गुरुवारला सकाळी बंडु ठाकरे यांचा मृतदेह गावातील वार्ड नंबर दोन येथिल विहिरित तरंगताना लोकांना दिसल्याने याबाबत पारशिवनी पोलिसात माहिती दिली.
याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी तक्रारदार मुलगा रितेश बंडु ठाकरे यांच्या तक्रारी वरून अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आणि मृतदेह शवविच्छेदन करिता ग्रामिण रुग्णालय पारशिवनी येथे पाठविले.घटनेचा पुढील तपास पारशिवनी पोलिस करित आहे.



