कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी तालुका अंतर्गत येणाऱ्या मौजा पारडी शिवारातून अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन पिकाला जप्त करून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चालक-मालक विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरची कारवाई पारशिवनी पोलिस डि.बी. पथकांनी केली.
दि. १४/ ५/२०२५ रोजी रात्री ११/३० वा. पावेतो पारशिवनी पोलिस स्टेशन येथुन थानेदार थोरात यांचे मार्गदर्शनात डि.बी.पथकचे पोलिस उपनिरीक्षक पिसे,पो हवा मुद्दस्सर जमाल,राकेश बंधाते,अमित यादव विरेन्द्रसिंह चौधरी सह पोलीस पथकत पारडी परीसरात पेट्रोलिंग करीत असतांनी, गुप्त माहितीच्या आधारे पारडी शिवार येथुन वाळू भरलेले दोन महिन्द्रा पिकअप जप्त केले.
जप्त केलेल्या वाहनांचे क्रमांक एम.एच.४०,सि.डी. ५३९०, दुसरे वाहन कुमांक एम.एच.४०,सि.टी. १९२८ असे आहेत.
दोन्ही वाहन मौजा पारडी शिवारतील नदीपात्रातून रेती भरून वाहतुक करीत असताना पारडी रोडवर दोन्ही महिन्द्रा पिकअप वाहन अडविले व पारशिवनी पोलिस स्टेशन च्या ङि.बी.पथकचे कर्मचाऱ्यांनी पिकअप वाहन व चार फावडे,घमेले जप्त करून पारशिवनी पोलीस स्टेशन परिसरत जमा केले.
तक्रारदार पो.हवा राकेश बंधाते यांच्या तक्रारीवरून चार आरोपी १) आकाश संजय धुर्वे वय २१ वर्ष रा.चिचोली खापरखेडा, २) अंकित विजय नेवारे वय २० वर्ष रा.इंदिरा नगर मातामाय मंदिर जवळ खापरखेडा ,३) गौरव मिताराम लांजेवार वय २७ वर्ष रा.न्यु भानेगाव उपासे ले आऊट खापरखेडा व ४) विजय शामराव नेवारे वय ४४ वर्ष रा. मातामाय मंदिर जवळ खापरखेडा यांना अटक करून कारवाई केली.
दोन्ही वाहन किमत ८ लाख रुपये २ ब्रास रेती ६ हजार रुपये व फावडे किमत १ हजार ६०० रुपये असे एकुण ८ लाख ०७ हजार ६०० रुपये किमती चा मुद्देमाल जप्त करून वाहन,रेती,फावडे,घमेले यांचा पंचनामा करून चालक मालक विरुध्द अपराध क्रमांक २२१/२५ अन्वये कलम कलम ३०३(२),३,५,४९ भारतिय न्याय संहिता सह कलम ४८ (७), ४८(८) , सह कलम ४,२१ महा.जमीन महसुल अधिनीयम सार्वजनीक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधि.नियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
यातील महिन्द्रा पिकअप वाहन मालक कार्तिक येसणे राहणार चिचोली हे फरार असुन पुढील तपास पो.हवा अमित यादव हे करीत आहेत व वाहन मालकचा शोध घेत आहेत .



