डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बाबासाहेबांच्या गीतांवर वैरागड येथील थिरकली भीमाचे लेकरं.  – दोन दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.  – बाबासाहेबांच्या प्रतीमेसह गावातून भव्य मिरवणूक.  – कार्यक्रमात आरमोरी पोलिस विभागा तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

प्रतिनिधी//प्रलय सहारे

       वैरागड : – विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (मोठा मोहल्ला) येथून बाबासाहेबांच्या प्रतीमेसह भव्य मिरवणूक काढून डिजेवर भिमारायांच्या गीतांवर शेकडोच्या संख्येने वैरागड येथील थिरकली भीमाचे लेकरं.

       भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैरागड गावात दोन दिवसीय दि. १४ ते १५ एप्रिल रोजी अती उत्सवात साजरी करण्यात आली. दि. १४ एप्रिल रोजी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (मोठा मोहल्ला) येथील विहारासमोर असलेल्या झेंड्याचे समाज अध्यक्ष संजय भैसारे यांच्या हस्ते निळा ध्वजारोहन करण्यात आला. त्यानंतर तेथून डिजेवर भीमाचे गीत लाऊन बाबासाहेबांच्या प्रतीमेसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक ग्रामपंचायत, गांधीचौक, बसस्थानक, महाराष्ट्र विद्यालय समोरून बाजार टोली येथील पंचशील चौक येथे असलेल्या झेंड्याचे अंगणवाडी सेविका गीता मेश्राम यांच्या हस्ते निळा ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक परत त्याच मार्गे येऊन पशू वैद्यकीय दवाखाना जवळ असलेल्या दिक्षाभुमी या जागेवर ग्रामपंचायत सरपंचा संगीता पेंदाम यांच्या हस्ते निळा ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर बसस्थानक जवळील सिद्धार्थ चौक येथे ग्रामपंचायत सदस्य गौरी सोमनानी यांच्या हस्ते निळा ध्वजारोहन करण्यात आले. तेथीलच अशोक चौक येथे ग्रामविकास अधिकारी बोदेले यांचे हस्ते निळा ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक गांधीचौक, ग्रामपंचायत मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परत आली. मिरवणुकीत ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.

दि. १५ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संध्याकाळी सहभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला. आणि रात्रौ वसंत वासनिक सर यांच्या परिवाराने संगीतमय सुमधुर भीम गीतांचा सुरेल कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धार्थ चौक, अशोक चौक आणि पंचशील चौक येथील समाज पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी आरमोरी पोलिस विभागा तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.