‘होनहार भारत – पोटँशियल युनिकॉर्नस ऑफ इंडिया’ विषयावरील परिषदेला चांगला प्रतिसाद

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी

पुणे : डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी(आंबी,पुणे) च्या वतीने ‘होनहार भारत -पोटेंशियल युनिकॉर्नस ऑफ इंडिया ‘ विषयावर आयोजित एक दिवसीय परिषदेला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. दि १५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.हॉटेल रामी ग्रँड येथे झालेल्या या परिषदेत भविष्यातील स्टार्ट अप,उद्यमशीलतेसंदर्भात ४ विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. पी एन जी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ,प्राथ अँड स्मिथ इंटरप्रायझेस च्या व्यवस्थापकीय संचालक प्रतिमा किर्लोस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

       उद्योजक सौरभ गाडगीळ, प्रतिमा किर्लोस्कर, पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे (संस्थापक,दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) आणि बीव्हीजी इंडिया लि. चे सामाजिक प्रकल्प विभागप्रमुख रवी घाटे, कुलगुरु डॉ.सायली गणकर यांच्या हस्ते युवा उद्योजकांना ‘ होनहार भारत ‘ पुरस्कार देण्यात आले. त्यात योगेश शिंदे(बांबू इंडिया)अमित सिंघल(फ्लुईड व्हेंचर्स),गौरव सूद(स्प्रिंग एनर्जी) ,अभिषेक वर्मा (लेन्स्कर्ट),मैत्रेयी कांबळे(स्वरा),ध्रुव पणिक्कर (डोमिनिक्स ग्लोबल),अमिताव नेवगी(सेंट्रम वेल्थ),अभिनव रांका (फार्म इझी),रोहन साळगांवकर (अवीरा),सौरव मंगरूळकर (इव्हेन्ट बी ),किटो टेक,९ युनिकॉर्नस या सारख्या कंपन्यांचा आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक पद्मश्री डॉ मिलिंद कांबळे, बीव्हीजी इंडिया लि. च्या सामाजिक प्रकल्प विभागप्रमुख रवी घाटे यांचा समावेश होता . डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी चे कुलपती डॉ.विजय पाटील यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.डी वाय पाटील युनिव्हर्सिटी च्या कुलगुरु डॉ सायली गणकर यांनी स्वागत केले. 

        सौरभ गाडगीळ म्हणाले,’उद्यमशीलतेची मानसिकता तयार करायला हवी.व्यवसायात धोका पत्करायची तयारी असली पाहिजे.स्वतःच्या संकल्पनांवर मेहनत घेतली आणि जगासमोर मांडल्या, तर विद्यार्थ्यांना व्यवसाय उद्योग क्षेत्रात चांगले यश मिळेल’.

प्रतिमा किर्लोस्कर म्हणाल्या, ‘यशाकडे वाटचाल करताना संयमाची गरज आहे. कारण आपण यशस्वी आहोत की नाही,हे बाजारपेठ ठरवत असते.आपण स्वतःला सतत अद्ययावत करीत राहिले पाहिजे.झालेल्या चुका परत होणार नाहीत,याची काळजीही घेतली पाहिजे.

देशाचे स्टार्ट अप हब होण्याची पुण्यात क्षमता : डॉ मिलिंद कांबळे

       डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, ‘नव संकल्पनांना संधी देणारी परिसंस्था देशात उभी राहत आहे. ४५ हजार स्टार्ट अप नोंदले गेले आहे. त्यात पुणे आघाडीवर आहे. देशाचे स्टार्ट अप हब होण्याची क्षमता पुण्यात आहे. जगभरातील कंपन्या, भांडवल पुण्यात आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांचा पूल निर्माण करता आला पाहिजे. ‘जी -२० मुळे भारतातील नव उद्योजकांना जागतिक संधी मिळणार आहे. पुणेकर गुंतवणूकदारांनी पुढे यावे.आताच्या जगात कोणीही बेरोजगार राहू शकत नाही. सर्वत्र उद्योगांना पोषक वातावरण आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.’

       रवी घाटे म्हणाले,’ स्टार्ट अप च्या व्याख्येपासून गोंधळ केला जातो.आपल्या जवळची व्यक्ती मोठी होत आहे, हे आपल्याला चटकन पेलत नाही.फक्त नफ्यासाठी काम केले तर आपल्या व्यवसायावर, सामाजिक दृष्टीकोणावर परिणाम होऊ शकतो. आपल्या हयातीत भारत महासत्ता होईल, इतकाच संकल्प केला पाहिजे.परदेशी संकल्पनांची कॉपी करता कामा नये’.

        डॉ.अजीम शेख यांनी प्रास्ताविक केले. प्रा.ओंकार समुद्र यांनी आभार मानले. चंद्रशेखर चिंचोलकर,प्रा.पूजा शर्मा,डॉ.प्रणव रंजन,डॉ.निनाद मोरे,डॉ.सचिन कुलकर्णी,डॉ.श्रीराम शास्त्री यांच्यासह विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.