युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
शिवणी रसुलपुर केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानपूर येथे नुकतीच संपन्न झाली.
या परिषदेचे आयोजन जि.प.शाळा धामक आणि सुलतानपूर यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र डोंगरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सुलतानपूर तर उद्घाटक म्हणून प्रशांत राऊत अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धामक व्यासपिठावर उपस्थित होते. तर मार्गदर्शक म्हणून सुरज मंडे, वैशाली दहीकर, कुमुदिनी वावगे, सुभाष गिरी व्यासपिठावर उपस्थित होते.
शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक केंद्राचे केंद्रप्रमुख अविनाश आढाव यांनी केले. विविध प्रशासकीय बाबी व शासकीय उपक्रम अमलबजावणी संदर्भात त्यांनी परिषदेला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद वानखडे तर आभार प्रदर्शन अविनाश राठोड यांनी पार पाडले.
आयुष्यातील पहिली स्पर्धा परीक्षा म्हणून शिष्यवृत्तीला सामोरे जाताना कशी तयारी करावी याविषयी वैशाली दहीकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांचे व केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांचे स्वागत पुस्तक व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये सुलतानपूर शाळेला नेहमी सहकार्य करणारी युवा प्रशिक्षणार्थी कुमार संपदा संतोष हाडके यांनी दिलेल्या शालेय शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांचा कार्याचा गौरव करण्यात येऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
सुरज मंडे यांनी विविध शासकीय धोरणे व शिक्षकांची होणारी तारांबळ आणि सहशालेय उपक्रम याबद्दल माहिती दिली. विजय नेमाडे यांनी खान अकादमी विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता राजेश कडू, दिपक विश्वनाथ धांडे, विरेन्द्र मोरे, रमेश शिंदे, विजय नेमाडे, रमेश राठोड, बी.जी.राठोड, प्रवीण ठाकरे, इर्शाद अहमद शेख चिनू, अन्सार खान, ज्ञानदेवी गणोरकर, वैशाली जावंजाळ, पुष्पा गेडाम, कुमुदिनी वावगे, अंजली नागपुरे, संगीता गद्रे, वंदना सरोदे, मेधा कराळे, विजया थोरात, संतोषी लढ्ढा अनघा चरडे, राजश्री पांडे, संध्या इंगोले, वंदना देवघरे, मेघना काळे, संगीता जाधव, कमल पळघन, रवींद्र डोंगरे, विनोद गुल्हाने, विलास दुधे, प्रशांत राऊत, बेबीताई मस्के, यांनी मोलाचे सहकार्य केले.



