Home देशविदेश पक्षांतराने नैतिकतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह!… — प्रश्र्न पडतोय,”सत्ता म्हणजे जातीयवादाला आणि...

पक्षांतराने नैतिकतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह!… — प्रश्र्न पडतोय,”सत्ता म्हणजे जातीयवादाला आणि धर्मांधतेला पोषक वातावरण निर्माण करणारे घातक हत्यार आहे काय?…

 रोखठोक

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

     स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यासाठी मराठीत पक्षांतरू,दलबदलू,तत्वहीन, किंवा सत्तेचे लोभी हे शब्द वापरले जातात.हे शब्द अशा नेत्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि त्यांना विश्वासार्ह नसलेले नेते मानले जातात….

           यामुळे पक्षांतराने नेत्यासह पक्षांच्या शिध्दांताची आणि वैयक्तिक नितीमत्तेची पत घसरु लागली आहे.याचबरोबर पक्षांतर केले की पक्षांतर केलेल्यांव्यक्तींवर जाती-धर्मात तेढ निर्माण करण्यासंबंधाने एक वेगळी जबाबदारी दिली जात असल्याची नवीन कार्यपद्धत सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.

           समाज मन घडविताना प्रयत्नांची पराकाष्ठा करीत पक्षांच्या विचारांना जनमानसात रुजवावे लागतय.पण,दलबदलू,पक्षांतरू,सत्तेचा लोभी,विश्वासघातकी म्हणजे पक्षाशी आणि लोकांसी गद्दारी करणारे,तत्वहीन म्हणजे कोणतीही विचारधारा नसलेले आयाराम-गयाराम,यांना तत्त्वनिष्ठा आणि समाजिक विश्वास कळत नसल्याने ते केव्हा कोणत्या भुमिका घेतील आणि निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यांना केव्हा बरबाद करतील हे सांगता येत नाही.

          तत्वहिन,विश्वासघात ही एक राजकीय संज्ञा आहे,जी वारंवार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांसाठी वापरली जाते.नेहमी पक्षांतर करणारे नेते,लोकप्रतिनिधी,पक्ष पदाधिकारी यांना लोकांच्या हितासी तिळमात्र संबंध राहातं नसल्याने ते बेताल बडबड करतात आणि सामाजिक वातावरण द्वेषी व दुषीत करण्यासाठी वेळ खर्ची घालतात.

         हेतू पुरस्कर पक्ष बदलणारे निष्ठाहीन व विश्वासघातकी असतातच,पण ते नैतिकदृष्ट्या भ्रष्ट,अस्थिर,संधीसाधू असतात हे सत्य नाकारता येत नाही.

          भाजपात पक्ष प्रवेश करणाऱ्यांना आता तर नवीन काम दिले जात आहे.उदा.१) समाजात आणि धर्मात तत्वहिन वैचारिक पध्दतीने तेढ निर्माण करणारे काम,२) राजकीय व सामाजिक दृष्ट्या मोठ्या नामवंत व्यक्तींना अयोग्य भाषेचा वापर करून वारंवार बदनाम करणारे काम.

          समाजात आणि धर्मात वारंवार तेढ निर्माण करुन ठेवले तर भारत देशात मोठ्या प्रमाणात असलेल्या ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक समाजातील महिला व पुरुष हे वैचारिक दृष्ट्या पंगू/विकलांग बनतात आणि स्वतःच्या हक्कांकडे दुर्लक्ष करतात,हे धर्मांधता व जातीयवादला खतपाणी घालणाऱ्या राजकारण्यांना माहिती असल्याने ते सत्तेचा व पदाचा दुरुपयोग करतात असेही दिसून आले आहे.

           सत्ताधारी आणि त्यांचे मंत्री,लोकप्रतिनिधी,पक्ष पदाधिकारी हे अकारण जातीयवादाला आणि धर्मांधतेला चुकीच्या कार्यपध्दती नुसार वैचारिक विष वारंवार बाहेर फेकत असल्याने तेच खरे राष्ट्रद्रोही,समाजद्रोही,नक्षलवादी व आतंकवादी आहेत काय? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.

          भारतीय संविधानाची शपथ घेणारे,महामहीम राष्ट्रपती,प्रधानमंत्री,भारताचे मंत्री,खासदार,महामहीम राज्यपाल,मुख्यमंत्री,मंत्री,आमदार आणि भारतीय संविधानाची सपथ न घेणारे सत्तेतील पक्ष पदाधिकारी,पक्ष प्रवक्ता हे भारत देशातील जातिभेद निर्मूलन करण्यासाठी आणि जातीभेदाच्या अंतर्गत अन्याय दूर करण्यासाठी अपयशी ठरत असल्याने,त्यांच्या कर्तव्यावर संदेह निर्माण होत आहे..

          तद्वतच भारत देशातील ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्याकांना सातत्याने उपेक्षित करुन ठेवणारी कृती सत्ताधारी करीत असल्याने,”सत्ताधारीच,हेच ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्याकांचा हक्कला पायदळी तुडवत असल्याचेही स्पष्ट आहे. 

         भारतीय संविधानाची पायमल्ली करणारे हे भाजपाचे सत्ताधारी असल्याने ते स्वत:च्या पद आणि गोपनीयतेची खिल्ली उडवतात असेही भारत देशातील सुज्ञ व जाणकार लोकांच्या लक्षात आले आहे.

            जे सत्ताधारी भारतीय संविधानाची आणि पद व गोपनीयतेची खिल्ली उडवतात त्यांच्याकडून लोकहिताची आणि समानतातंर्गत सद्भावनेची अपेक्षा करता येत नाही.तद्वतच ते वैचारिक व कृती अंतर्गत द्वेषी असल्याने तेच सर्वात जास्त लोकशाहीचे मारक आहेत,हे स्पष्ट आहे…

        सत्ता ही भारत देशातील व भारत देशांतर्गत राज्यातील लोकांसाठी मारक ठरत असेल,तर ती सत्ता लोककल्याणकारी आहे असे म्हणता येत नाही.

          भारत देशाचे सत्ताधारी आणि भारत देशांतर्गत राज्याचे सत्ताधारी हे लोकांचे संरक्षण करण्यासाठी आणि जातीभेद नष्ट करण्यासाठी धडपडत नसतील,त्या अनुषंगाने कर्तव्य पार पाडत नसतील,जातीभेद व धर्मभेद कमी करण्यासाठी कृती करीत नसतील आणि लोकांना धर्मभेदात अडकून ठेवण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करीत असतील तर ते सत्ताधारी बेलगाम,मतलबी,विवेकशुन्य,समाजद्रोही,राष्ट्रद्रोही आहेत असे म्हणावे लागेल?…

          भाजपाचे मंत्री,खासदार,आमदार,हे लोकहितावर व लोक हक्कावर वरतोंडी बोलतात.मात्र याबाबत त्यांची कृती लोकद्रोही असल्याने ते भारतीय संविधाना नुसार भारत देशातील लोकांच्या हक्कासाठी/हितासाठी संघर्ष करताना अजिबात दिसत नाही.

           तद्वतच भारतीय संविधानाला अनुसरून लोकहिताचे काम भाजप सत्ताधारी करताना दिसत नाही.यामुळे जातीभेदाला आणि धर्मभेदाला पोषक वातावरण निर्माण करणारे भाजपा सत्ताधारी व त्यांचे लोक हे,”लोकहितकारी,नाही असेच म्हणावे लागेल….

         ज्यांच्या सत्तेमुळे लोक भयभीत होतात,असुरक्षित होतात,त्या सत्ताधाऱ्यांना चांगले कसे म्हणावे? हा गंभीर मुद्दा आहे.

          म्हणूनच प्रश्र्न पडतोय,सत्ता म्हणजे द्वेष पसरविणारे,”जातीयवादाला व धर्मवादाला खतपाणी घालणारे घातक शस्त्र आहे?