भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली व्दारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयात संस्थेचे प्रेरणास्थान श्रध्येय स्मृतिशेष कै श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय थुल सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.थुल सर यांच्या शुभहस्ते कै जीवनराव पाटील मुनघाटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी कै जीवनराव पाटील मुनघाटे यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला.
यावेळी डॉ.पंकज चव्हाण,डॉ.गणेश चुदरी, प्रा. ज्ञानेस बनसोड, डॉ.संजय मुरकुटे, डॉ.सचिन धवनकर, डॉ. प्रियंका पठाडे, डॉ.प्रवीण गोहणे, प्रा.मांतेश तोंडरे, डॉ. नितेश पुण्यप्रेड्डीवार, प्रा. निवेदिता वटक, प्रा.वसंत आवारी, प्रा.विराग रणदिवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.गणेश चुदरी तर आभार प्रदर्शन डॉ.नितेश पुण्यप्रेड्डीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.संदीप मानापूरे,श्री.हरिश्चंद्र गोहणे,श्री. गणेश लांबट,श्री.भास्कर कायते यांच्यासह श्री,भास्कर वाढणकर, श्री.बालाजी राजगडे यांनी मोलाचे सहकार्य केले.



