Home Social राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप उत्साहात…

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप उत्साहात…

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

 दि.१४ फेब्रुवारी : राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित विशेष शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित श्री जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय यांच्या वतीने मेंढा (लेखा) येथे हे सात दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ५० स्वयंसेवकांनी सहभाग घेत विविध सामाजिक उपक्रम राबवले.

           शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, जलसंवर्धन, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक प्रबोधन यांसारखे उपक्रम घेण्यात आले. स्वयंसेवकांनी श्रमदानातून गावातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला.

          समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ गणेश चुदरी होते. प्रमुख पाहुण्या म्हणून नंदाताई दुगा (सरपंच) उपस्थित होत्या. तसेच सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ प्रवीण गोहणे सदाशिव दुगा (पोलीस पाटील), बाजीराव नरोटे, डॉ किरमिरे, डॉ जंबेवार मॅडम, डॉ चौहान आणि डॉ झाडे यांची उपस्थिती लाभली. 

स्वयंसेवकाचे मनोगत…

        “या शिबिरामुळे आम्हाला गावाच्या समस्या जवळून समजल्या. स्वच्छता, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षण याबाबत लोकांमध्ये जागृती करता आली, याचा आनंद आहे. समाजासाठी काम करताना जबाबदारीची जाणीव निर्माण झाली,” असे मनोगत एका स्वयंसेवकाने व्यक्त केले.

           शिबिरामुळे गावात स्वच्छता व जनजागृतीचा सकारात्मक संदेश पोहोचल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रियंका पठाडे मॅडम कार्यक्रमाचे संचालन गौरव सोनुले यामिनी सोनुले यांनी केले तर आभार प्रदर्शन यामिना सोनुले हिने मानले. कार्यक्रमाला गावातील नागरिक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.