इंदापूर महाविद्यालयात पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी लुटला आनंद…  — विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक माध्यमातून केले कलेचे सादरीकरण…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

   इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक दिवस व रॅम्प वॉकच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

          मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आपल्या पारंपारिक वेशभूषा परिधान करून आपल्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन तसेच रम्प वॉक च्या माध्यमातून कला सादर करून विद्यार्थ्यांनी आज आनंद लुटला.

            संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे संचालक राजवर्धन पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आज पारंपारिक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वेशभूषचे सादरीकरण केले.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राजाराम गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार क्रीडासंचालक डॉ. भरत भुजबळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.