प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
राज्यात २९ महानगरपालिकां निवडणूकातंर्गत नगरसेविका व नगरसेवकांसाठी काल मतदान झाले.”आज मतमोजणी,परंतु निकालांच्या आकडेवारीकडेच महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची ताकद,भाजपाच्या सत्तेची मुजोरी,वंचित व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची रणनीती आणि बसपाची हजेरी यावर निकाल असेल असे वाटते आहे.
परंतु मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची एकी व मुंबईला वाचवण्यासाठी असलेली त्यांची तळमळ आणि पोटतीडकी मतदारांनी मनात घेतली होती.
मुंबई महानगरपालिकेचा निकाल हा जगाचे लक्ष वेधणारा असल्याने या महानगरपालिकेच्या निकालाकडे अख्या देशाच्या नजरा लागलेल्या आहेत हे महत्त्वाचे आहे.
नाशीक महानगरपालिका निवडणूकीत सर्व पक्षाची हजेरी असली तरी इथे सुध्दा जनता विरुद्ध भाजपा असा निकाल असेल.भाजपा जिंकली तर मतदार हरले आणि भाजपा हरली तर मतदार जिंकले असेच म्हणावे लागेल.
नाशीक महानगरपालिका निवडणुकीत भाजपा प्रमाणेच ठाकरे बंधूंनी जिव ओतला.याचबरोबर अँड.प्रकाश आंबेडकरांनी निकाल फिरविण्यासाठी रणनिती आखली.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मेहनत घेतली.
पण,नाशिक मध्ये मतदार जिंकणार हि आशा असताना भाजपा इथे मागे पडणार असे गृहीत धरले जात आहे.नाशिक हे ठाकरे बंधूकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अकोला महानगरपालिका ही वंचितचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर यांचे गृहस्थान आहे.त्यांच्या किती उमेदवारांनी महानगरपालिका निवडणूक लढली,यापेक्षा किती उमेदवार निवडून येतात याकडे भारत देशाचे लक्ष लागलेले आहे.
अकोला जिल्हा अँड.प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने ओळखला जातोय.ही ओळख कायम ठेवण्यासाठी तेथील मतदार हे त्यांच्या पाठीशी नेहमी राहीले आहेत!
यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अकोला महानगरपालिका निवडणुकीत जास्त प्रमाणात निवडून येतात काय? याकडे अकोला वाशियांबरोबर देशाचे लागले आहे.
नागपूर शहर हे केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरींचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह महानगर आहे.येथील मतदार हे ना.नितीन गडकरी यांच्याकडे बघून भाजपाला मते देतात असे दिसून आले आहे.
कुठल्याही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नागपूर शहरात जातपात न बघता ना.नितीन गडकरी चालतात,यामुळे या शहरात भाजपचे वर्चस्व आहे.
मात्र यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नागपूर महानगरपालिका निवडणूकीत जिव ओतला,यामुळे महानगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांची सदस्य संख्या घटते काय?हेच बघण्यासारखे आहे.
तद्वतच नागपूर महानगरपालिकेत बसपाने दोन दा दमदार एंट्री केली होती.यामुळे नागपूर महानगरपालिका निवडणुकीत यावेळी बसपाचे नगरसेवक किती निवडून येतात याकडे,आर.एस.एस.प्रमुख मोहन भागवत,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बसपाचे लक्ष लागले आहे.
इतर २५ महानगरपालिका निवडणूकीकडे सुध्दा नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे.यापैकी बृहन्मुंबई,ठाणे,पुणे,पिंपरी चिंचवड,आणि चंद्रपूर महानगरपालिका काय निकाल देतात याकडे राजकारण केंद्रीत झाले आहे.
विशेषतः ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका ही ठाकरे बंधूंकडे जावी अशी मतदारांची इच्छा असावी असे वाटत असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचीही मजबूत पकड तिथे आहे.
परंतु आज लागलेला निकाल हा महाराष्ट्र राज्यातील जनतेचा श्वास मोकळा करणारा असणार आहे की,श्वासाचा कोंडमारा करणारा असणार हे स्पष्ट होईलच!
कारणं महानगरपालिकांच्या निकालात महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.मात्र ईव्हिएम मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुक प्रक्रियेची विश्वासार्हता राहिली नसल्याने निकालाबाबत मतदार व विरोधी राजकीय पक्षांचे पक्षप्रमुख ईव्हिएम मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांवर कमालीचे नाराज आहेत.
प्रसंगानुरूप ईव्हिएम मशीनच्या माध्यमातून पाहिजे तसे निकाल फिरवले जातात,असे म्हणणे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम,लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी,राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे आहे.
तद्वतच ईव्हिएम मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय संविधानाची,लोकशाहीची,नागरिकांच्या अधिकारांची गळचेपी सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे..


