राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती सोनसरी ग्रामपंचायत येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
सरपंच सौ.मिनाक्षी भाईचंद वट्टी व इतर पदाधिकाऱ्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करुन विनम्रपणे अभिवादन केले.
आज दि.१५ नोव्हेंबर २०२५ ला ग्रामपंचायत कार्यालय सोनसरी येथे सकाळी ठीक ९:३० वाजता जननायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी सौ.मीनाक्षी भाईचंद वट्टी सरपंचा,श्री.झुनुकलाल बि.चौधरी उपसरपंच,श्री.जयंत मु.प्रधान,सौ.यमुना रा.चौधरी,सौ.कल्यानी छ.प्रधान तसेच श्री.विनोद बोरकर ग्रा.पं.कर्मचारी,श्री.सुरेंद्र ध.मंगर केंद्र चालक आदि.उपस्थीत होते.



